मुंबई

विनायक शिंदे हाच सचिन वाझे यांचा कलेक्टर!

पूजा विचारे

मुंबई: मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने रविवारी सकाळी दोन आरोपींना अटक केली. हिरेन यांच्या हत्या प्रकरणात सचिन वाझे हे मुख्य आरोपी असून हिरेन यांच्या हत्येच्या कटात नव्यानं अटक केलेल्या दोन आरोपींचाही समावेश होता असा दावा एटीएसने केला. मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आलेले पोलिस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि सट्टेबाजारी करणारा बुकी नरेश गोरे याला रविवारी महाराष्ट्र एटीएसने अटक केली. त्यापैकी विनायक शिंदे यांच्या घरात महाराष्ट्र एटीएसने झाडाझडती घेतली. दरम्यान विनायक शिंदे हा तर सचिन वाझेंचा कलेक्टर होता असं म्हटलं जात आहे. 

ATS  च्या चौकशीत शिंदेकडे ३२ बार आणि क्लबच्या नावांची यादी मिळाल्याचं बोललं जातं आहे. शिंदेच्या चौकशीतून मुंबई पोलिसांच्या वसुलीचे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान हिरेन हत्या प्रकरणाचा गुन्हा NIA कडे न देण्याबाबत राज्यसरकारचा निर्णय झाल्याचं समजतंय. त्यामुळे वेळप्रसंगी न्यायालयात धाव घेण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वीच केंद्रानं हा गुन्हा NIA ने ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते. ATSची तपासाची गती पाहता, हा गुन्हा NIAकडे वर्ग केल्यास तपासाला खिळ बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेला विनायक शिंदे हा निलंबित पोलिस आहे. लखनभैय्या एन्काऊंटरमध्ये त्याला शिक्षा झाली होती. त्यानंतर तो गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फर्लोवर जेलमधून बाहेर आला होता. रविवारी एटीएसने त्यांना अटक केल्यानंतर निलंबित पोलिस कर्मचारी विनायक शिंदेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. 

ठाण्यातील कळवा नाक्यावरील 'गोल्ड सुमीत' नावाच्या इमारतीत गेली अनेक वर्षे विनायक शिंदे वास्तव्यास आहे. विनायक शिंदेच्या आईच्या नावावर या इमारतीतील राहतं घर आहे. एटीएसची टीम संध्याकाळच्या सुमारास विनायक शिंदे याच्या घरी पोहोचली. एटीएसची टीम इमारतीच्या परिसरात दाखल झाल्यानंतर शिंदे याची पोलिस असं लिहिलेली चारचाकी त्यांना घराखालीच उभी असलेली दिसली. 

Mansukh Hiren Case Vinayak Shinde Sachin Waze collector

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT