मुंबई

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, मृतदेहाची ओळख न पटण्यासाठी केलेलं 'असं' काही...

अनिश पाटील

मुंबई : मनसुख यांना 4 मार्च रोजी ज्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर ते घरातून बाहेर पडले.असं बोललं जातं मात्र सीडीआरनुसार त्यावेळी मनसुख यांना कोणताही फोन आला नव्हता असे समोर आलं आहे. जर कुणी फोन केला असेल तर तो Whats App कोळ किंवा अन्य इंटरनेटच्या माध्यमातून केला असण्याची शक्यता आहे.

तपासात मनसुख यांच्याकडे जो फोन होता त्यात दोन सीम कार्ड होते. त्यामुळे त्याचे दोन लोकेशन दाखवले जात आहेत. दोन्ही सीमकार्डची लोकेशन ही एकमेकांपासून 20 मीटर असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. याबाबत आम्ही त्या त्या परिसरात नागरिकांशी चर्चा करत आहोत. मात्र अद्याप पोलिसांना मनसुख यांचा मोबाइल सापडला नाही.

मनसुख हिरेनच्या पत्नीने एटीएसला दिलेल्या जबाबात सचिन वझे यांचं नाव घेतलेलं आहे. त्यामुळे एटीएसचे अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी एटीएसने वझे यांना चौकशीसाठी एटीएस नागपाडा मुख्यालयात बोलावलं होतं, वाझे हे यापूर्वी या गुन्ह्यात चौकशी अधिकारी म्हणून राहिले आहेत. त्यामुळे त्या संबधित प्रश्न वाझे यांना विचारण्यात आले.

NIA च्या पथकाने घेतली गुन्ह्याबाबतची माहिती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया निवासस्थानजवळ 25 फेब्रुवारीला पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओमधून 20 जीलेटीन कांड्या सापडल्या होत्या. त्यात अडीच किलो जीलेटीन होते. पण ते कुढल्याही स्फोटक डीव्हीईला जोडण्यात न आल्यामुळे धोकादायक नव्हते. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 286, 465, 473, 506(2)120(ब) तसेच स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अंतर्गत गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास पथकाने(एनआयए)  आपल्या हातात घेतला आहे. त्यानंतर मंगळवारी एनआयएच्या महानिरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांच्या पथकाने दहशतवाद विरोधी पथक व गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन गुन्ह्याबाबतची माहिती घेतली. यावेळी काही महत्त्वपूर्ण कागदपत्र व पुरावेही त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अनिल शुक्ला व विक्रम खिलारे हे दोन अधिका-यांनी एटीएस व गुन्हे शाखेला भेत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

mansukh hiren death case all the jewelry were removed from body before death

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT