Sachin-Waze-Anil-Parab 
मुंबई

सचिन वाझेचं शिवसेनेच्या अनिल परबांशी कनेक्शन?

विराज भागवत

Mansukh Murder Case मध्ये नवा ट्विस्ट; भाजप नेत्याकडून खळबळजनक आरोप

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजवणारं प्रकरण म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण (Mansukh Hiren Murder Case). या प्रकरणात मुंबई पोलिसांची (Mumbai Police) प्रतिम काही अंशी खराब झाली. पोलीस अधिकारी सचिन वाझेला (Sachin Waze) या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याच्यापाठोपाठ काही निलंबित पोलिस कर्मचारी, बुकी आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांनाही ताब्यात (Arrest) घेण्यात आले. या प्रकरणात बड्या नेतेमंडळींचा हात आहे की नाही याबद्दल बऱ्याच चर्चा (Discussions) रंगल्या होत्या. याच दरम्यान भाजपचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सचिन वाझे प्रकरणाचा संबंध थेट शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याशी जोडला आहे. (Mansukh Murder Case Sachin Waze Anil Parab Connection Prado Car Partnership)

शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. कोकणातील दापोली येथे परब यांनी बेकायदेशीररित्या एक रिसॉर्ट उभारला असून त्यासाठी त्यांनी १० कोटी खर्च केले आहेत. या पैशाचा हिशेब द्यावा, असं सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सोमय्या यांनी एक गौप्यस्फोट केला. सचिन वाझेच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये एक प्राडो कार सापडली होती. ही कार सध्या NIAच्या ताब्यात आहे. या कारचा अनिल परब यांच्याशी अप्रत्यक्ष संबंध असल्याचा सोमय्या यांनी दावा केला. अनिल परब यांचे भागीदार सदानंद कदम आणि सदानंद कदम यांचे भागीदार विजय भोसले. मनसुख हिरेन प्रकरणात NIA च्या ताब्यात असलेली प्राडो कार ही विजय भोसले यांनी वाझेला दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, दोन-चार दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही किरीट सोमय्या आणि भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. अनिल परब यांनी कोकणातील दापोली येथे वाळूवर एक रिसॉर्ट बांधला असून तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामाची पर्यावरण मंत्रालयाच्या एका विशेष टीमकडून चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याचसंबंधी राज्यपाल कोश्यारी यांनीही प्रकरणात लक्ष घालावे आणि परब यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT