मुंबई

कोकणात जाण्यासाठी दोन दिवसांत केवळ तीनच प्रवाशांचे आरक्षण; कोरोना चाचणीमुळे चाकरमान्यांची एसटीकडे पाठ

प्रशांत कांबळे

मुंबई : गौरी-गणपतीच्या उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 6 ऑगस्टपासून एसटीने मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बस स्थानकांवरून बसगाड्या सुरु केल्या. 6 ते 12 ऑगस्टपर्यंत सुमारे 11 हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीचे आगाऊ आरक्षित केले होते. या सहा दिवसांत 406 बसगाड्या मुंबई विभागातून कोकणात रवाना झाल्या आहेत. मात्र 13 ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने एसटीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.  

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने एसटीचे नियोजन केले होते. मात्र 13 ऑगस्टपासून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने एसटीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. गुरुवारी एक तर शुक्रवारी फक्त दोन असे तीनच प्रवाशांनी एसटीचे आरक्षण केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

या परिस्थितीतही एसटीने 13 ते 21 ऑगस्टपर्यंत कोकणात चाकरमान्यांसाठी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी करण्याची अट ठेवली आहे. या चाचणीत प्रवासी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरच त्यांना कोकणात गावी जाता येणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी एसटीकडे पाठ फिरवल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

कामगार तर मुंबईत परतायत; मात्र हाताला पुरेसे कामच नसल्याने करायचे तरी काय?

रेल्वेच्या गणपती विशेष रेल्वेचा एसटीला फटका  
एसटीच्या 13 ते 21 ऑगस्टदरम्यान चालवण्यात येणाऱ्या अतिरिक्त एसटी सेवेला प्रवाशांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आता मध्य रेल्वे मार्गावरून 15 ऑगस्टपासून 162 फेऱ्या तर पश्चिम रेल्वे मार्गावरून 20 फेऱ्या 16 ऑगस्टपासून सोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना कोरोना चाचणी करण्याची कोणतीही अट नसल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आता रेल्वेचा पर्याय निवडण्याकडे कल दिल्याने त्याचा एसटीला फटका बसणार आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT