वसई : गेल्या आठवड्यात मुंबईसह पालघर, वसई-विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. अनेक घरात, दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. एवढेच नव्हे तर पावसाच्या पाण्यात अनेक वाहने अडकून पडल्याने वाहनेही नादुरुस्त झाल्याचे चित्र आहे.
वसईत पावसामुळे रस्ते, गृहसंकुल पाण्याखाली गेल्याने शेकडो वाहने नादुरुस्त झाली असून शहरातील गॅरेजमध्ये वाहनांची गर्दी झाली आहे. एकीकडे लॉकडाऊनमध्ये आर्थिक भुर्दड पडत असताना नागरिकांना दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा फटका बसत आहे. वसई विरारमधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रिक्षांचे भाडे परवडत नसल्याने स्वतःच्या वाहनांना प्राधान्य देत आहे. परंतु पावसामुळे दुचाकी, चारचाकी वाहने नादुरुस्त झाली आहेत.
सायलेन्सरमध्ये पाणी जाणे, इंजिन बिघडणे, वाहन चालू न होणे यासह अन्य बारीकसारीक बिघाड झाले असल्याने गॅरेजमध्ये वाहनांची गर्दी वाढत आहेत. गॅरेजच्या बाहेर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. यात दुचाकींचा अधिक समावेश आहे. पाचशे रुपयांपासून ते हजारो रुपये दुरुस्तीसाठी खर्च होत आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे वेतन वेळेवर न मिळाल्याने आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत असताना बसगाड्यांची संख्या पुरेशा नाहीत, खासगी वाहनांचे भाडे अधिक आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच्या वाहनांनी कामावर जातो परंतु वाहनांत बिघाड झाल्याने दुरुस्तीचा अधिक खर्च समोर आला असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात वाहनांमध्ये पाणी शिरल्याने अनेक वाहन नादुरुस्त झाली आहे. लॉकडाऊनमध्ये बरेच कामगार गावी गेल्याने दुरुस्तीसाठी अडचणी निर्माण होत असून एकाच दिवशी सर्व वाहने दुरुस्त करणे शक्य होत नाही. त्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असल्याचे वसई येथील गॅरेज मालक छोटू शेख यांनी सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.