मुंबई

'मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले असतानाही ही दडपशाही कशासाठी?'

'मराठ्यांनी शांततेत मोर्चे काढले असतानाही ही दडपशाही कशासाठी?' भाजपच्या केशव उपाध्येंचा ठाकरे सरकारला सवाल Maratha Kranti Morcha in Solapur Police Force Deployed to stop Protest BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Govt

विराज भागवत

भाजपच्या केशव उपाध्येंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून माजी आमदार नरेंद्र पाटील (Former MLA Narendra Patil) यांनी सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाची (Maratha Kranti Morcha) हाक दिला. सकाळी 11च्या सुमारास सोलापुरातील श्री छत्रपती संभाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हा मोर्चा रवाना होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मोर्चाला परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी कोल्हापूर, सांगली येथून बंदोबस्त मागवून नाकेबंदी केली. काल शांततापूर्ण मार्गाने आपला निषेध नोंदवणारे वारकऱ्यांना अटक करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपकडून ठाकरे सरकारवर कडक शब्दात टीका करण्यात आली. (Maratha Kranti Morcha in Solapur Police Force Deployed to stop Protest BJP Keshav Upadhye slams Uddhav Thackeray Govt)

'काल वारकऱ्यांवर कारवाई. आज सोलापूरात मराठा समाजाचा मोर्चा निघू नये म्हणून अभूतपूर्व बंदोबस्त आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिस फौजफाटा, सर्व बाजूने रस्ते बंद.. मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढलेत, मग ही दडपशाही कशासाठी? अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोक कसं विसरतील?', असे ट्वीट करत भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. या मोर्चामध्ये ग्रामीण भागातून आंदोलक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता असल्याने ग्रामीण पोलिसांनी कोल्हापूर, सांगली येथून बंदोबस्त मागविण्यात मागवला. तालुक्याच्या ठिकाणी साखळी पद्धतीने हा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सोलापूर शहराकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर बंदोबस्त असून प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. शनिवार, रविवारी संचारबंदी असल्याने अत्यावश्यक कामासाठीच वाहनांना प्रवेश दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT