Manoj Jarange Patil esakal
मुंबई

Manoj Jarange Patil Mumbai: मराठा आंदोलकांचा अशा प्रकारे होणार नवी मुंबईत पाहुणचार; झाली जंगी तयारी!

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Mumbai : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘चलो मुंबई’ चा नारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यानी सुरू केलेली पदयात्रा गुरुवारी (ता. २५) पनवेलमध्ये येत आहे. या यात्रेच्या स्वागताबरोबरच आंदोलकांची व्यवस्था करण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांनी चोख व्यवस्था केली असून आंदोलकांच्या जेवणापासून मुक्कामाची जय्यत तयारी केली आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जिल्ह्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गावबंदी असो, साखळी उपोषण किंवा जिल्ह्यात झालेल्या सभांमधून सोबत असल्याचे मराठा समाजाने वेळावेळी दाखवून दिले आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या बेमुदत उपोषणासाठीही अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंतच्या ४०७ किलोमीटरच्या या पदयात्रेत जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा बांधव सहभागी होत आहेत. आंदोलकांचा हा जथ्था गुरुवारी (ता.२५) सकाळी ११ वाजता पनवेल येथे पोहोचणार असल्याने त्या अनुषंगाने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कळंबोली येथे मुंबईकरांकडून त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. तसेच पनवेलसह रायगडमधील लाखो मराठा समाजही कळंबोलीपासून या पदयात्रेत सहभागी होणार आहे.

आंदोलनाला सर्व समाजांचा पाठिंबा
पदयात्रेत सामील होणाऱ्या आंदोलकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी कळंबोली ते बेलापूरपर्यंतच्या मार्गावर दोन्ही बाजूने स्टॉल मांडण्यात येणार आहेत. पनवेल, कामोठे, कळंबोली, करंजाडे, खांदेश्वर, खारघर या ठिकाणच्या मराठा समाज बांधव, विविध संघटना तसेच पनवेल सकल मराठा समाजाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाच्या दुपारच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे. याचबरोबर मुस्लिम, शीख समाजाच्या वतीने अन्नाचे वाटप केले जाणार आहे.

आंदोलक पनवेलमध्ये दाखल
- रक्तामध्ये उसळे तापता लाव्हा... शिवराय या शब्दाची आण आम्हाला, या सध्या गाजत असलेल्या गाण्याची ऊर्जा घेत आरक्षणासाठी आरपारच्या मोहिमेची तयारी पश्चिम महाराष्ट्रातून झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमधून शेकडो वाहनांनी लाखो मराठा बांधव पनवेल, नवी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाल्याची माहिती समन्वयकांनी दिली.


- साताऱ्यातून २५ ट्रक, ५०० वाहने, कऱ्हाड ७५ ट्रक, ५०० गाड्या, खटावमधून २० हजारांचे नियोजन, फलटणमधून ५०० चारचाकी वाहनांनी मुंबईकडे कूच केली आहे. अशाच प्रकारे सांगली, सोलापूर, कोल्हापूरमधूनही नियोजन झाले आहे. आलेले पदयात्री रात्री वाशी येथे थांबणार असून दुसऱ्या दिवशी चेंबूरमार्गे आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहेत.

मुंबईतील मराठी कुटुंबांची मदत
राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील, तालुक्यातील लोक मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. गिरणी कामगारांपासून चालत आलेल्या प्रथेनुसार प्रत्येक गावाच्या स्वतःच्या मालकीच्या मुंबईमध्ये खोल्या आहेत. गिरणी कामगारांच्या काळातील या खोल्यांमध्ये आंदोलकांचा तळ असणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा बांधवांची आपल्या हक्काच्या खोल्यांमध्येच व्यवस्था होणार आहे. यासाठी पनवेलपासून मुंबईपर्यंतच्या घरात जास्तीत जास्त आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन केले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: गणेश नाईक हजार 25 हजार 52 एवढ्या मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT