Devendra Fadnavis  
मुंबई

Maratha Reservation: "त्यांची राजकीय जात ओळखू येते"; आरक्षणविषयक बैठकीला दांडी मारणाऱ्या विरोधकांवर फडणवीस भडकले

पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांत टीका केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठकीचं आज सह्याद्री अतिशीगृहावर आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला शेवटच्या क्षणी संध्याकाळी ६ वाजता विरोधकांनी अर्थात महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला, असं सांगत यातून त्यांची राजकीय जात ओळखू येते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर चांगलेच भडकले. पत्रकरांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांत टीका केली. (Maratha Reservation his political caste is discernible Devendra Fadnavis lashed out opposition who staged meeting)

फडणवीस म्हणाले, आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. उपस्थितांनी ज्या काही सूचना मांडल्या आहेत त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय घेतील. मला वाटलं होतं की शरद पवार तरी उपस्थित राहतील. मात्र, महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजत राहावी अशी विरोधीपक्षाची भूमिका आहे.

मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. मात्र ऐनवेळी विरोधीपक्षानं, मविआनं या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांना मराठा आरक्षणासारख्या विषयासाठी वेळ नाही मात्र वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर राजकीय बैठक करायला वेळ आहे. यावरुन त्यांची राजकीय जात ओळखू येते, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांवर शेलक्या शब्दांत टीका केली.

दरम्यान, बैठकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी एक महत्वाची भूमिका मांडली. आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांचे मुद्दे लेखी मागितले पाहिजेत, अशी त्यांनी सूचना केली. त्यांच्या या महत्वाच्या सूचनेवर विचार करण्याचं आश्वासन मुख्यंमत्र्यांनी दिलं असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT