Chandrakant Patil Google
मुंबई

"तुमचा अभ्यास बरोबर असेल, तर कोर्ट तुम्हाला चूक का म्हणेल?"

Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचा अशोक चव्हाणांना थेट सवाल

विराज भागवत
  • Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचा अशोक चव्हाणांना थेट सवाल

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाला पूनर्विलोकन याचिकेद्वारे (Review Petition) आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केली. त्यानुसार, राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी शुक्रवारी दिली. सर्वोच्च न्यायालयाने रिव्ह्यू पीटीशन दाखल करण्यासाठी ४ जूनपर्यंतची मुदत दिली होती. पण या सरकारने अद्याप ती याचिका दाखल केलेली नाही. मराठा आरक्षणसाठी review petition दाखल करण्यामध्ये उशीर (Delay) का झाला? असा थेट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारला केला. तसेच, जर सरकारचा अभ्यास (Study) बरोबर असेल, तर मग सुप्रीम कोर्ट तुम्हाला कशासाठी चुकीचं ठरवेल? असा सवाल त्यांनी अशोक चव्हाण यांना केला. (Maratha Reservation review petition BJP Chandrakant Patil slams Mahavikas Aghadi Minister Ashok Chavan CM Uddhav Thackeray)

"या सरकारचा आरक्षणाबाबतचा दृष्टीकोन खूपच बाळबोध आहे. OBC आरक्षणातही हीच गोष्ट दिसून आली. आता मराठा आरक्षणासाठी इतका उशीर कशासाठी करता आहात? भोसले समितीने सांगितलं की पुनर्विचार याचिकेशिवाय पर्याय नाही. याचिका केल्यावरच गोष्टी पुढे जातील. मग तरीदेखील इतका उशीर का होतोय? मराठा समाजाला आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं पण त्याला मान्यता मिळवणं या सरकारला शक्य झालं नाही", असा आरोप पाटील यांनी केला.

"सारं काही केंद्राकडून मागायची अशोक चव्हाण यांना सवय लागली आहे. जर तुमचा अभ्यास बरोबर असेल, तर मग सुप्रीम कोर्ट तुम्हाला कशासाठी चुकीचं ठरवेल? कोणताही नेता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अगदी शरद पवार स्वत: असतील तरीही आम्ही त्यांच्या मागे उभे राहू", असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. "पेट्रोल डिझेलच्या भाववाढीबद्दल काँग्रेसने जी निदर्शने केली, ती त्यांनी वर्षा किंवा मातोश्री बंगल्याबाहेर केली पाहिजेत. कारण राज्याने लावलेल्या करामुळे हे भाव गगनाला भिडले आहेत. राज्य सरकारने इतर राज्यांमधील भाव पाहावेत आणि निर्णय घ्यावा", असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT