मुंबई : आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तिकेचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रकाशन कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते आणि आमदार आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. महाराष्ट्रतील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधन होण्याची गरज आहे असं म्हणत राज्यात कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी आशा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. "संदर्भ पुन्हा अनचॅलेंज राहू नये म्हणून, जर विषय मुख्यमंत्रिपदाचा असेल, तर पवारसाहेब, कर्तृत्त्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळागणारा समाजात मोठा वर्ग आहे, त्याला माझ्यासारख्या माणसाचं सुद्धा समर्थन असू शकतं", असं भाजप आमदार आशिष शेलार म्हणालेत.
महत्त्वाची बातमी : ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय
यावेळी बोलताना आशिष शेलार असंही म्हणालेत की, महाराष्ट्रात मोठ्या पदावर बरीच लोकं आहेत, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसलेली व्यक्ती या महाराष्ट्रात कमी दिसतात. मला कुणाशीही तुलना करायची नाही, पण अशा व्यक्ती कमी आहे, असं देखील आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणालेत.
जेष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी ‘कर्तृत्वान मराठा स्त्रिया’ हे पुस्तक सावित्रीबाई फुलेंना अर्पण करून या पुस्तकाच्या माध्यमातून एका जातीचं उदात्तीकरण करण्यात आल्याच्या मानसिकतेलाही छेद दिल्याचा उल्लेख आशिष शेलार यांनी यावेळी केला केलाय.
maratha women first chief minister maharashtra ashish shelar sharad pawar vijay chormare
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.