मुंबई

Eknath Shinde: मराठी भाषा भवनामुळे भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी बळ मिळेल!

Shivsena: भाषा भवनासाठीच्या साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांवर काम केले जाईल, असे म्हणाले.

Chinmay Jagtap

Mumbai: मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी उत्तम आणि दर्जेदार होण्यासाठी मुंबईतील मराठी भाषा भवनाच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बृहन्मुंबई पालिका विकासनिधी तथा मुंबई शहर जिल्हांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांच्या भूमिपूजन तसेच लोकार्पणाप्रसंगी दूरदृश्य प्रणालीवरून ते बोलत होते.


मराठी भाषा भवनाचे आज सागराच्या भूमिपूजन होत असल्याचा आनंद होत आहे. या भवनाच्या माध्यमातून मराठी भाषेच्या संवर्धन, संशोधन आणि प्रसारासाठी अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, भाषा भवनासाठीच्या साहित्यिक व अन्य क्षेत्रातून आलेल्या सूचनांवर काम केले जाईल, असे म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अनेकांचे योगदान आहे. संतांनी अभंग, गवळण, भारूड यातून मराठी भाषेचे सौंदर्य समोर आणले. ज्ञानपीठकारांनी आणि सर्व साहित्यिकांनी भाषा समृद्ध केल्याचा दावाही त्यांनी केला. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषामंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.



साहित्यिकांच्या राहण्याची मुंबईत सोय

मुंबईत येणाऱ्या साहित्यिकांच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी कवी मंगेश पाडगावकर यांच्या नावाने साहित्य भवन बांधणार येणार आहे. तसेच, सातारा येथे विश्वकोश मंडळासाठी नवीन इमारत, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव केले जाणार आहे.


मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या वैभवात भर पडली आहे. मराठी भाषा संवर्धन आणि विकासासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, मराठी भाषिक आणि साहित्यिकांना अभिमानास्पद वाटेल, असे भवन येथे उभारले जाईल.


- दीपक केसरकर, मराठी भाषामंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT