file photo 
मुंबई

मराठी भाषा भवन रंगभवनातच उभारणार

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : रंगभवन परिसरातच मराठी भाषा भवन उभे कसे करता येईल, यासाठी जोरबैठका सुरू झाल्या आहेत. त्यासंबंधातील तरतुदींकडे नव्याने लक्ष देण्याचे प्रयत्न मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने सुरू झाले आहेत.

मायमराठी कटोरा घेऊन मंत्रालयासमोर उभी असल्याची कुसुमाग्रजांनी व्यक्‍त केलेली खंत अभिजात दर्जाबाबत दिसते; तसेच कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या मराठी भाषा भवनाबाबतही दिसते. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक ज्या मराठी भाषा भवनासाठी धडपडत होते, ते पार गावकुसाबाहेर नवी मुंबई परिसरात फेकले गेले होते. हे मराठी भाषा भवन पुन्हा दक्षिण मुंबईतील झगमगाटी, मानाच्या जागेत उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे.

हेही वाचा ः शरद पवार नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील धोबी तलाव भागात काही वर्षांपूर्वी मराठी भाषा भवन उभे राहणार होते; परंतु संबंधित जागेचा समावेश वारसा वास्तू यादीत असल्याचे सांगून त्या शक्‍यतेवर फुली मारण्यात आली होती. वारसा वास्तू दर्जा मुंबई महापालिका ठरवत असल्याने शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेतून संबंधित कागदपत्रे हलवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.

सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत वारसा यादीतील ही इमारत विशेष प्रयत्न करून मराठीच्या विकासासाठी वापरता येईल का, याचा विचार करण्यात आला. रंगभवन परिसरात ऍम्फीथिएटर सुरू करण्याचा विचार मध्यंतरी समोर आला होता.

हेही वाचा ः नवी मुंबईत निवडणुकांपूर्वी 'लिंबू मिरचीचा खेळ चाले'​
 
शेजारीच कामा आणि जीटी ही रुग्णालये असल्यामुळे या परिसरात ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करा, अशी जनहित याचिका न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या याचिकेची काय स्थिती आहे, कर्णकर्कश भोंग्यांचा विचार न करता तेथे अभिजात कार्यक्रम सादर करता येतील का, याचीही चाचपणी केली जाणार आहे.

मराठी भाषा पंधरवडा पाळण्यास नवे सरकार विसरले, अशी टीका झाल्यानंतर या संदर्भात सावध पावले टाकण्याचा निर्णय उच्च स्तरावरून घेण्यात आला आहे. त्यानुसार धोबी तलावाशेजारील रंगभवनाचे रूपांतर मराठी भाषा भवनात केले जाणार आहे. 


संबंधित विभाग एका छताखाली 
झेवियर्स महाविद्यालयालगतच्या इमारतीमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कार्यालयामागील जागेत मराठीशी संबंधित सर्व विभाग एका छताखाली आणण्याची योजनाही आकार घेत आहे. मराठी माणसाच्या हक्‍काची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असल्याने मराठीला मानाचे स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात येणार आहे. भाषा भवनाबाबत झालेल्या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रमुख अधिकारी भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्‍ता लवंगारे वर्मा, मराठी कार्य संचालनालयाचे प्रमुख विभीषण चवरे आदी उपस्थित होते, असे समजते.
 

रंगभवनातच भाषा भवन उभारण्यातील अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- सुभाष देसाई, मराठी भाषा मंत्री 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT