Uddhav Thackeray, Devendra Fadnavis esakal
मुंबई

Devendra Fadnavis: "मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या बाजूनं नाही"; फडणवीसांनी भाजपच्या बैठकीत सांगितलं गणित

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मराठी माणूस लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाजूनं नाहीत, असा मोठा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना त्यांनी हे विधान केलं. केवळ विधानच नाहीतर त्यांनी याबाबतची आकडेवारी देखील सांगितली आहे. (Marathi man not on Uddhav Thackeray side in Loksabha Election 2024 says Devendra Fadnavis in BJP meeting)

फडणवीस म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक नरेटिव्ह मांडले गेले त्यापैकी एक नरेटिव्ह मांडला गेला की, उद्धव ठाकरेंना सहानुभुती होती. उद्धव ठाकरेंना सहानुभुती होती तर मग ती मुंबई आणि कोकणात का दिसली नाही? ठाण्यापासून ते कोकणच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंना एकही जागा नाही. कोकणात उबाठा नाही, ठाण्यात उबाठा नाही, पालघरमध्येही उबाठा नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये उबाठाला एकही जागा मिळालेली नाही.

मुंबईच्या ज्या जागा मिळाल्या त्या कोणाच्या जीवावर मिळाल्या? मराठी माणसांनी यांना मत दिलेलं नाही. जर मराठी माणसानं यांना मतं दिली असतील तर आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे तिथं केवळ फक्त ६,००० मतांचा लीड आहे. मराठी माणसानं शिवडीत मतदान केलं असतं तर तिथं ३० ते ४० हजारांची लीड मिळायला हवी होती. ईशान्य मुंबईसाठी विक्रोळी-भांडूप मिळून ६०,००० मतांचा लीड त्यांना मिळायला हवा होता, ७ ते ८ हजारांवर ते त्या ठिकाणी थांबले.

याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेलेला नाही. पोलिटिकल अर्थमेटिकमध्ये त्यांनी विशिष्ट समाजाच्या मतांवर काही जागांवर एखाद्या विधानसभेत इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. उबाठानं याची जाहीर कबुली देखील दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की, मला मराठा आणि दलित समाजापेक्षाही मी निवडून आलो ते मुस्लिम समाजामुळं निवडून आलो. त्यामुळं एकूणच आपण पाहिलं तर मुंबई, मुंबई महानगर रिजनमध्ये किंवा कोकणात उबाठाला लोकांनी हद्दपार केलं आहे, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT