Ravi Patwardhan Passed Away  
मुंबई

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (वय 83) यांचे वृद्धापकाळाने ठाणे येथे काल रात्री निधन झाले. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले असून अगंबाई सासूबाई ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

रवी पटवर्धन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. 1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवचे अध्यक्ष बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वीच या नाटकाचे पुनरुज्जीवन झाले त्यातही वयाच्या 82 व्यावर्षी रवी यांनी तीच धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. ते सातत्याने वेगवेगळ्या चित्रपट, नाटकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत होते. भारदस्त व्यक्तिमत्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील जरबमुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश किंवा खलनायक प्रवृत्तीच्या भूमिका मिळत. कथा कोणाची व्यथा कुणाला, प्रपंच करावा नेटका, हृदयस्वामिनी, बेकेट, मुद्राराक्षस, कौतेय, आनंद, वीज म्हणाली धरतीला, मला काही सांगायचंय, अपराध मीच केला ही त्यांची काही गाजलेली नाटके. त्यांनी आत्तापर्यंत 200 हून अधिक चित्रपट आणि 150 हून अधिक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. संस्कृत भाषेवर प्रभृत्व असलेल्या पटवर्धन यांनी वयाच्या 80 व्या वर्षी भगव्दगीतेचे 700 श्लोक पाठ केले होते. शृंगेरी मठातर्फे घेतलेल्या पाठांतर परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. 

सध्या ते झी मराठीवरील अगंबाई सासूबाई या मालिकेतील आशुतोष पक्ती म्हणजेच सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकारलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. आसावरीच्या पाठीशी भक्कम उभे राहणारे, सोहमला धाकात ठेवणारे आजोबा म्हणजेच रवी पटवर्धन यांच्यावर अख्ख्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम केले. कोरोना काळात चित्रिकरणावर लावण्यात आलेली बंदी यामुळे मालिकांचं चित्रिकरण बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, अनलॉकमध्ये चित्रिकरणाला परवानगी मिळाल्यानंतर एकदा दोनदा रवी पटवर्धन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यामातून मालिकेत दिसून आले होते. त्यांच्या वयामुळे ते चित्रिकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ठाण्यात पाचपाखाडी येथे ते वास्तव्यास होते. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. काल रात्री रवी पटवर्धन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away

-------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT