marriage of cricketer tushar deshpande of csk ipl cricket mumbai Sakal
मुंबई

Tushar Deshpande Marriage : चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडेचा विवाह

चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये हा लग्न सोहळा नुकताचसंपन्न झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dombivli News : चेन्नई सुपर किंग्जचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला आहे. कल्याणमध्ये हा लग्न सोहळा नुकताचसंपन्न झाला. अनेक दिग्गज फलंदाजांची विकेट काढणाऱ्या तुषार देशपांडेला नभा गड्डमवारने क्लीन बोल्ड केलं आहे.

नभा गड्डमवार ही त्याची कॉलेजची मैत्रीण असून काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तुषार देशपांडे हा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नईचा संघ चॅम्पियन बनला होता. या हंगामात त्याने दमदार गोलंदाजी केली होती. यानंतर कॉलेजच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा साखरपुडा झाला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लग्नाची एकच चर्चा रंगली होती .

नभा या कॉलेजच्या गर्लफ्रेंड सोबत विवाह बंधनात तुषार अडकला आहे. या विवाह सोहळ्याला त्याचे क्रिकेटचे मार्गदर्शक मित्र आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांस शुभ आशीर्वाद दिले आहेत. आयपीएल आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणाऱ्या प्रशांत सोलंकी,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर, शिवम दुबे या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली होती.

कोण आहे तुषार देशपांडेची होणारी लाईफ पार्टनर?

नाभा गद्दमवार असं तुषार देशपांडेच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरचं नाव आहे. तुषारने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केली आहे.यावेळी त्याने नाभा ही त्याची शाळेपासूनची क्रश होती आणि आता ती त्याची लाईफ पार्टनर बनली आहे, असं म्हटलंय.

आयपीएल 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी..

आयपीएल 2023 स्पर्धेत तुषार देशपांडेने दमदार कामगिरी केली आहे. एमएस धोनीने दिलेली जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने या स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये 21 गडी बाद केले आहेत. यादरम्यान 45 धावा करत 3 गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Constituency: मनसेनं २००९ मध्ये कोणते मतदारसंघ जिंकले होते? ते आमदार आता कुठे आहेत? राज ठाकरेंना पुन्हा यश येणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Tax Evasion: देशात 18,000 बनावट कंपन्या; सरकारची 25,000 कोटी रुपयांची फसवणूक, काय आहे प्रकरण?

शेवटी आईच ती! दिवाळीच्या सुट्ट्या संपवून शूटिंगला परतणाऱ्या सिम्बाला निरोप देताना हमसून रडली माउली, नेटकरी म्हणाले-

Sawantwadi Election : सावंतवाडीत राजकीय 'संशयकल्लोळ'; बंडखोरीमुळे मतदारसंघात पेच, कोण कोणाची मते पळवणार?

SCROLL FOR NEXT