narendra dabholkar mumbai
मुंबई

नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधारांना केव्हा पकडणार?

रायगड अं.नि.सचा शासनाला सवाल, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

पाली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खूनाला शुक्रवारी आठ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खूनाच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? असा सवाल करत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रायगड जिल्हा अंनिस ने आज केली आहे. या संदर्भातील निवेदन शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे देण्यात आले. (Pune News)

या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे आणि मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केलेले आहे. तर अमोल काळे या संशयित आरोपीविरूद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपीविरूद्धही सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखलच करण्यात आलेले नाही.

या खूनाचा तपास डॉ. विरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत थांबलेला आहे. या खूनामागील सूत्रधार कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून मागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे. अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनामागील सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. या वेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी अंनिस रायगडचे जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, जातीअंत विभाग राज्य सदस्य निलेश घरत, महिला विभाग राज्य सदस्य मीना मोरे, मंदाकिनी गायकवाड, श्वेता सुभेकर हे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फलक दाखवून घोषणा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT