मुंबई

मुंबईतल्या कोरोनाच्या गंभीर स्थितीवर महापौरांनी दिली महत्त्वाची बातमी

पूजा विचारे

मुंबई: शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. शहरातील स्थिती कोरोनामुळे गंभीर बनली आहे. दरम्यान मुंबईतल्या कोरोनाच्या परिस्थितीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोविड रुग्णांना योग्य बेड मिळावं. म्हणून पाऊल उचलले असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई पालिकेनं अॅक्शन प्लान तयार केला आहे. 

आपण प्रत्येक वार्डात 2 नोडल अधिकारी नेमतोय. रुग्णांना रात्री बेडसाठी विशेषतः ते मदत करतील. मुंबईकरांना १९१६ वर फोन केल्यावर व्यस्त असल्याचं कळतं. पण विनंती आहे. जिथे आपण राहतो त्या प्रभाग कार्यालयातील वॉर रूम मध्ये फोन करावं. त्यामुळे मदत मिळण शक्य होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

२४ तासाच्या आत अहवाल द्या. म्हणजे उपचार लवकर देता येतील आणि योग्य ठिकाणी वर्गवारी करून त्यांना दाखल करता येईल, असं पालिकेनं लॅबला सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

खासगी रुग्णालयात लक्षणे नसलेले रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये आपण त्यांना राहण्यासाठी कोविड सेंटरसारखी व्यवस्था करून देऊ, पैसे त्यांनाच भरावे लागतील. त्यांना हॉटेल निवडण्याची परवानगी असेल. तिथे सगळी रुग्णालयाप्रमाणे व्यवस्था असेल, अशी माहितीही महापौरांनी दिली आहे. सगळी सोय तिथे असेल. कारण नसताना बेड अडवू नये म्हणून निर्णय घेतला असल्याचं त्या म्हणाल्यात.

आयसीयू बेड्स पालिकेने ३२५ अतिरिक्त जोडले आहेत. ४६६ वर बेड तयार आहेत. येत्या ७ दिवसात ११०० बेड कोविड सेंटर तयार करून तयार केले जातील, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. 

अग्निसुरक्षा सप्ताह यंदा होणार नसून गुडीपाडवा घरी आनंदाने साजरा करा आणि आंबेडकर जयंती आहे. मुंबईकरांनी आनंदाने साजरी करा. पण घरी राहून साजरी करा. बाबासाहेबांनी केलेली देशसेवा स्मरून आपणही घरी राहून देशसेवा करू. तेच खर अभिवादन ठरेल, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केलं आहे.

Mayor kishori pednekar on Mumbai Corona Virus Situation bmc covid 19 beds

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT