Tuberculosis sakal media
मुंबई

एमडीआर क्षयाचा खात्मा करणार औषधांचा कॉम्बो; 100 रुग्णांवर चाचणी

दोन वर्षांऐवजी फक्त 6 महिने घ्यावी लागणार औषधं

भाग्यश्री भुवड

मुंबई : एमडीआर आणि एक्सडीआर क्षयाचा (MDR tuberculosis) खात्मा आता तीन औषधांचा (three medicines) कॉम्बो करणार आहे. ही औषधे पालिकेकडून (bmc) एमडीआर आणि एक्सडीआर रुग्णांना दिली जातील. 100 रुग्णांवर (patients) ही क्लिनिकल चाचणी (clinical test) मुंबईतील दोन रुग्णालयांमध्ये केली जाईल.  पालिकेच्या (bmc hospitals) गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयात (शताब्दी) ही चाचणी सुरू झाली आहे. शताब्दी व्यतिरिक्त, हे औषध घाटकोपरच्या सर्वोदय रूग्णालयातही वापरण्यात येईल.

क्षयाचे जाळे मुंबई सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात पसरलेले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात 45 ते 50 हजार नवीन क्षय रुग्ण आढळून येत आहेत. यापैकी 10 टक्के असे रुग्ण आहेत जे मल्टी ड्रग रेझिस्टंट (एमडीआर) मध्ये बदलतात, म्हणजे काही क्षय औषधे त्यांच्यावर कुठलाच परिणाम करत नाहीत. अशा क्षयरुग्णांच्या उपचारासाठी बेड्याकुलिन औषध प्रथम आले. हे औषध घेतलेल्या एमडीआर क्षय असलेल्या रुग्णांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

मुंबई क्षयरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी सांगितले, गेल्या दोन वर्षांत, या औषधाच्या वापराने एमडीआर क्षयरुग्णांच्या रिकव्हरीचा पुरावा 75 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आता ही टक्केवारी आणखी वाढवण्यासाठी तीन औषधांचा कॉम्बो पॅक बनवण्यात आला आहे, ज्याची चाचणी सुरू झाली आहे. या कॉम्बो पॅकमध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रॅटोमॅनिड, लिनेझोलिड आणि बेड्याकुलिन गोळ्यांचा समावेश आहे. या तीन औषधांच्या क्लिनिकल ट्रायलला एम-बीपाल असे नाव देण्यात आले आहे.

6 महिने घ्यावी लागणार औषधे

शताब्दी रुग्णालयाच्या क्षय केंद्राचे प्रमुख डॉ. विवेक ओसवाल यांनी सांगितले की, ही क्लिनिकल चाचणी आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली जात आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, रुग्णांना 6 महिन्यांसाठी तीन औषधे दिली जातील आणि त्यांच्या परिणामांवर दोन वर्षे लक्ष ठेवले जाईल.

कसे करावे लागणार सेवन

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रुग्णांना आठवड्यातून दररोज बेडाक्विलीन,प्रिटोमॅनिड, लिनेझोलाईड प्रत्येकी एक गोळी दिली जाईल. यानंतर, दुसऱ्या आठवड्यापासून फक्त बेडाक्विलीन एक दिवस आड करुन  दिले जाईल, तर प्रिटोमॅनिड ,लिनेझोलाईड दररोज सेवन करावे लागणार आहे. औषधे घेण्याची ही प्रक्रिया 6 महिने चालू राहील.

20 औषधांपासून मिळणार मुक्तता

सामान्यत: टीबीच्या रुग्णांना दररोज 20 औषधे घ्यावी लागतात, परंतु यशस्वी चाचण्यांनंतर रुग्णांना 20 औषधांऐवजी दररोज फक्त तीन गोळ्या घ्याव्या लागतील. एवढेच नाही तर रुग्णांना या 'बी-पाल' चे सेवन 18 ते 24 महिन्यांऐवजी केवळ 6 महिन्यांसाठी करावे लागेल.

एमडीआर रुग्णांची वाढती संख्या

मुंबईत, एमडीआर रूग्ण म्हणजेच ज्यांच्यावर सामान्य टीबी रुग्णांना दिलेली औषधे काम करत नाहीत. सामान्य टीबीपासून एमडीआरमध्ये रूपांतरित होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नियमित औषधे न खाणे किंवा औषधांचा कोर्स अपूर्ण सोडणे. 2018 मध्ये मुंबईत एमडीआरचे 5594 रुग्ण, 2019 मध्ये 5673, 2020 मध्ये 4367 आणि मार्च 2021 पर्यंत 1224 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे 2020 मध्ये ही संख्या कमी नोंद करण्यात आली आहे, परंतु अधिकाऱ्यांनी ही संख्या जास्त असल्याचे सांगितले आहे.

भारतात एकूण 9 ठिकाणी या औषधोपचार पद्धतीचा अवलंब

9 पैकी मुंबईत 2 केंद्र. गोवंडी येथील शताब्दी महानगरपालिका रुग्णालय आणि घाटकोपरचे सर्वोदय रुग्णालय या दोन ठिकाणी ही सुविधा, गोवंडी शताब्दी रुग्णालयात आज भारतातील सर्वात पहिल्या रुग्णावर एम-बीपाल पद्धतीने औषधोपचार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT