आदिवासी विकास योजनांतील गैरव्यवहार चौकशीत ढिसाळपणा  
मुंबई

आयटीआयमध्येही पोषण आहार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः आदिवासी विकास योजनांतील तब्बल ६००० कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीत राज्य सरकार जाणीवपूर्वक ढिसाळपणा करत असून, दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असे ताशेरे बुधवारी (ता. ८) मुंबई उच्च न्यायालयाने ओढले. सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून कर्तव्य बजावले पाहिजे, असेही खंडपीठाने सुनावले.

आदिवासी विकास योजनांतर्गत जीवनोपयोगी वस्तूंच्या खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत नाशिक जिल्ह्यातील बाहीराम मोतिराम यांनी उच्च न्यायालयात २०१२ मध्ये जनहित याचिका केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या प्रकरणाच्या चौकशीत २०१४ पासून राज्य सरकारचे अधिकारी ढिसाळपणा करत असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात कसूर केली जात आहे, अशी टीका खंडपीठाने केली.

राज्य सरकारने न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने दिलेल्या चौकशी अहवालात आदिवासी विकास योजनांमध्ये अपहार झाल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT