Mumbai Local news Central Railway Mega Block today local cancel Know in detail sakal
मुंबई

Mumbai Local News : रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ; जाणून घ्या कुठे आणि कसा होणार लोकलवर परिमाण!

उपनगरीय प्रवासी वेळेचे नियोजन करा: मेगाब्लॉकमुळे रविवारी बदलेल सेवा आणि वेळापत्रक |Plan suburban travel times Services and timetables will change on Sundays due to megablocks

सकाळ वृत्तसेवा

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा -ठाणे अप आणि डाउन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्व -

कुठे- माटुंगा- ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी ११ .०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर रेल्वे

कुठे - पनवेल- वाशी अप आणि डाउन मार्गावर

कधी -सकाळी ११. ०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी दरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

पश्चिम रेल्वे-

कुठे - सांताक्रुज ते गोरेगांव अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम-

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुज ते गोरेगांव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. अंधेरी आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT