मुंबई

26/11 दहशतवादी हल्ला : पोलिस आयुक्तालयात उभे राहतेय भव्य शहीद स्मारक

अनिश पाटील

मुंबई, ता. 19 : मुंबईवर 26/11 ला झालेल्या  दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे नवे भव्य स्मारक पोलिस आयुक्तालयात उभारण्यात येत आहे.  23 नोव्हेंबरपर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार असून 26 नोव्हेंबरला यावर्षी प्रथमच या नव्या स्मारकावर श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे.

मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखान्यासमोर 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांचे स्मारक उभारण्यात आले होते. गेली 11 वर्ष त्या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम व्हायचा. पण सध्या मरिन ड्राईव्ह परिसरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात रस्त्यांचे तसेच मेट्रोची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे तेथील स्मारकासमोर मोठा बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयात नवी पोलिस आयुक्तालयायाची मोठी इमारत उभी करण्यात आली आहे. त्याच्या समोरच हे नवे स्मारक उभारण्यात येणार आहे.

23 नोव्हेंबरपर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण होणे प्रस्तावीत आहे. त्यानुसार काम सुरू  असून यावर्षीचा श्रद्धांजली कार्यक्रम याच स्मारकावर करण्यात येणार असल्याचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी सांगितले. 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 197 जण ठार झाले, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.

दहशतवाद्यांनी शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा आणि कामा रुग्णालयाच्या मागच्या गल्लीत दहशवाद्यांनी हल्ला केला होता.

या हल्ल्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमच फेम विजय साळसकर, पोलिस निरीक्षक शशांक शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन, एनएसजी हवालदार चंदर, गजेंद्र सिंग हे शहीद झाले होते. त्यांच्या बलीदानानंतर मरीन ड्राईव्ह येथे शहीद स्मारक उभारण्यात आले होते. 11 वर्षानंतर नवे भव्य स्मारक पोलिस आयुक्तालयात उभे राहतेय.

memorial to pay tribute to the martyr of 2611 mumbai terror attack is being build in commissioner office

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT