Case of Hit and Run sakal
मुंबई

Case of Hit and Run : ‘हिट अँड रन’प्रकरणी मिहीरला सहा दिवस पोलिस कोठडी

वरळी ‘हिट अँड रन’प्रकरणी मिहीर शहा याला शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिहीर आणि चालक बिदावत यांच्या जबाबात तफावत असल्याचे पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वरळी ‘हिट अँड रन’प्रकरणी मिहीर शहा याला शिवडी येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिहीर आणि चालक बिदावत यांच्या जबाबात तफावत असल्याचे पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले. त्यामुळे दोघांना समोरासमोर ठेवून चौकशी करणे आवश्यक आहे तसेच अपघातानंतर मिहीरने कोणाशी संपर्क साधला? तो कोठे गेला होता? त्याला लपण्यास कोणी मदत केली ही माहिती मिळविण्यासाठी त्याला पोलिस कोठडी ठोठावण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला.

तो ग्राह्य धरत न्या. सुहास भोसले यांनी मिहीरला १६ जुलैपर्यंत कोठडीत धाडले. मिहीरकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का? याबाबत वरळी पोलीस तपास करत आहेत. मिहीरने चौकशीत आपल्याकडे परवाना असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप मिहीर किंवा त्याचे कुटुंब हा परवाना पोलिसांसमोर सादर करू शकलेले नाहीत. त्यामुळे मिहीरकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का? हे तपासण्यासाठी पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे.

प्राथमिक चौकशीदरम्यान मरीन ड्राईव्हहून परतताना मी गाडी चालवीत होतो अशी कबुली मिहीरने दिली आहे, अशी माहिती तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र अपघात घडला तेव्हा तो गाडी चालवीत होता का? याबाबत मात्र या अधिकाऱ्याने माहिती देणे टाळले. आमच्याकडील घटनाक्रम आणि मिहीरने दिलेली माहिती यात अनेक ठिकाणी तफावत आढळली असून त्यामुळे त्याने केलेला प्रत्येक दावा तपासला जाणार आहे. अपघात घडला तेव्हा मिहीर दारू किंवा अमली पदार्थांच्या नशेत होता का? याचाही तपास होणार आहे.

नाखवा कुटुंबाला १० लाखांची मदत

हिट ॲण्ड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

जेजेत वैद्यकीय चाचणी

विरारहून ताब्यात घेतल्यानंतर मिहीरची जेजे रुग्णालयात अटकपूर्व वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. हे नमुने पुढील चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. अपघातानंतर मिहीरला आश्रय देणाऱ्या, पळवून जाण्यास मदत करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाईल, असे पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT