gold and foreign currency seized Customs Department at Mumbai Airport sakal
मुंबई

Mumbai Crime News : मुंबई विमानतळावर कोट्यवधीचे सोने आणि परदेशी चलन जप्त

मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यवधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यवधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8-9 फेब्रुवारी 2023 रोजी सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवायांमध्ये ही जप्ती करण्यात आली आहे.

सीमाशुल्क विभागाने एका व्यक्तीकडून सुमारे 2.8 किलो सोने जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 1.44 कोटी रुपये एवढी आहे . मुंबई विमानतळावर अजून एका कारवाईत सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे 90 हजार अरब अमिराती दिरहाम आणि दुसऱ्या प्रवाशाकडून 90 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त केले. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत अंदाजे 92 लाख रुपये आहे.

अमेरिकन डॉलर्सची तस्करी करणाऱ्या आरोपी प्रवाशाने हे डॉलर्स एका पॅकेटमध्ये ठेवले आणि ते आपल्या बॅगेत अशा प्रकारे शिवून लपवले होते की नजरेत पकडणे फार कठीण होते, मात्र सीमा शुल्क विभागाने कमालीची हुशारी दाखवत आरोपीला पकडले. तसेच दिरहमची तस्करी करणाऱ्या व्यक्तीने एका बॉक्समध्ये दिरहम अशा प्रकारे लपवून ठेवला होता की, कस्टम विभागालाही एकदा फसवले होते, मात्र कसून चौकशी केल्यानंतर आरोपी पकडला गेला.

परदेशातून सोने आणि विदेशी चलन तस्करीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नुकतेच कोची विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने एका प्रवाशाकडून सुमारे दोन किलो सोने जप्त केले. सोने पॅक केल्यानंतर आरोपी लपवून घेऊन जात होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत अंदाजे 85 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे कस्टम विभागाला चकमा देण्यासाठी प्रत्येक वेळी आरोपी विचित्र पद्धतीचा अवलंब करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT