मुंबई

अंबरनाथच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करा; पाणी पुरवठा मंत्र्यांचे आदेश 

श्रीकांत खाडे

अंबरनाथ  : अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठ्यात सुधारणा करून पाण्याची गळती रोखून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. 

शहरातील वाढत्या पाणीटंचाईसंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मागील आठवड्यात शिष्टमंडळासह पाणीपुरवठामंत्री पाटील यांची भेट घेत त्यांना बैठक घेऊन पाणीप्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यावेळी पाटील यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार पाटील यांच्या दालनात बुधवारी (ता. 4) बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत अंबरनाथ शहरातील पाणीटंचाई संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी समस्येवर ठोस उपाययोजना राबविण्यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. 

या बैठकीला शिवसेना विभागप्रमुख पद्माकर दिघे, सचिन गुडेकर, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, रवींद्र पाटील, ऍड. निखिल वाळेकर, चंद्रकांत भोईर, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता मनीषा पालांडे, एमआयडीसी मुख्य अभियंता सुधाकर वाघ, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तिमनवार, उल्हासनगर प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे, पाणीपुरवठा उपसचिव राजेंद्र गेंगणे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, एमआयडीसी कार्यकारी अभियंता राजाराम राठोड, मजीप्रा कार्यकारी अभियंता एस. के. दशोरे उपस्थित होते. 

विविध मुद्द्यांवर चर्चा
अंबरनाथ शहरातील वाढती पाणी गळती थांबविणे, चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे. चिखलोली धरणाचे काम पूर्ण होईपर्यंत बारवी धरणातून अंबरनाथकरिता अतिरिक्त पाणी येत्या आठवड्याभरात उपलब्ध करून देण्यात यावे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे एमआयडीसीच्या असलेल्या 86 कोटींच्या थकबाकीचे व्याज माफ करावे, चिखलोली धरणातून अंबरनाथ पूर्व भागातील वडवली विभाग, महालक्ष्मीनगर, शिवाजीनगर, कृष्णानगर आदी भागात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्या संदर्भात धरणालगत असलेल्या व धरणात रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर एमआयडीसी जलसंपदा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात यावी, आदी विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. 
---------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT