jitendra awhad  sakal media
मुंबई

दक्षिण मुंबईच्या कामाठीपुरा आणि कुलाबात कायापालट होणार, आव्हाडांची घोषणा

कामाठीपुराच्या समूह पुनर्विकासाचे लक्ष्य, कुलाबाच्या झोपडपट्टीचाही विकास

तेजस वाघमारे

मुंबई : दक्षिण मुंबईतील (south mumbai) मोक्याचे ठिकाण असलेल्या कामाठीपुरा (kamathipura) आणि कुलाबा (colaba) येथील झोपड्यांचा समूह पुनर्विकास (redevelopment) करण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी रविवारी केली. वरळी बीडीडी चाळ (worli BDD chaul) पुनर्विकासाचा प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी आव्हाड यांनी ही घोषणा केली. ( Minister jitendra Awhad announces south mumbai kamathipura and colaba redevlopements-nss91)

कामाठीपुरा येथील सुमारे 40 एकर जमिनीवर वसलेल्या एक हजार इमारतींपैकी 700 इमारती आणि चाळी 100 वर्षे जुन्या असून अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. किमान 50 ते 180 चौरस फुटांच्या छोट्याशा खोलीत राहत आहेत. पावसाळ्यात या भागातील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळून लहान मोठ्या दुर्घटना घडतात. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रर्रचना मंडळाच्या उपकरप्राप्त इमारती अधिक आहेत. या इमारतींचा पुनर्विकास सैफी-बुऱ्हानी अपलिफ्टमेन्ट ट्रस्टच्या (एसबीयूटी) धर्तीवर समूह पुनर्विकासाच्या योजनेतून राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या हालचाली मंडळाने सुरू केल्या आहेत.

यासोबतच कुलाबा येथील 32 एकर जागेवरील झोपड्यांचा समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. 16 एकर जागेवर झोपडपट्टी वासीयांचे पुनर्वसन करण्यात येईल. तर उर्वरित जागेवर विक्री घटकासाठी घरे उभारण्यात येणार आहेत. बीडीडी चाळींच्या पुनर्वसनाचे काम सुरू झाल्यानंतर आता गृहनिर्माण विभागाने कामाठीपुरा आणि कुलाबा येथील झोपड्यांच्या पुनर्विकासाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT