Nawab Malik sakal media
मुंबई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी राष्ट्रवादी - नवाब मलिक

नरेश शेंडे

मुंबई : केंद्रीय तपास यत्रणांच्या (CBI) रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूरच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालयाने (Enforcement Directorate) छापा टाकला होता. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं असून राज्यकर्त्यांकडून देशमुखांवर झालेल्या कारवाईबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यावर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत, तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या दबावाखाली (Bhartiy Janata Party) काम करतात. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचं काम केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. अशी टीका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपवर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनिल देशमुख यांच्या पाठिशी आहे,असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ( Minister Nawab Malik Criticizes BJP over Anil Deshmukh Case)

राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेबद्ल नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ते म्हणालेत, "केंद्रीय तपास यंत्रणांचे काही अधिकारी भाजप केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करीत आहेत.राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सूडबुद्धीने त्रास देण्याचं काम केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून सुरु आहे. देशमुख चौकशीला सहकार्य करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशमुखांच्या पाठीशी आहे. भाजपचे सरकार नेत्यांना बदनाम करत आहे"अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. तसंच या बैठकीत राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.राष्ट्रवादीच्या संघटना वाढीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

आगामी पावसाळी अधिवेशनात आमदारांकडून कोरोना परिस्थितीच आढावा घेतला जाईल. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी अशी मागणी होत आहे. त्यामुळं कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. महाविकास आघाडीत समन्वय आहे. भाजपकडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय त्याला काही अर्थ नाही. दोन दिवसाच्या अधिवेशनात जे काही मुद्दे उपस्थित केले जातील त्याला उत्तर देण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारची आहे."असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

अपुऱ्या लशींअभावी महाराष्ट्रात लसीकरण संथ गतीनं सुरु आहे. डेल्टाप्लसचा संसर्ग झालेल्या २१ रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाने कोविड १९ लशीची पहिली मात्रा घेतली होती.राज्यात पुरेसा लशींचा साठा असल्यास दोन महिन्यांतच लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांना लशींचे डोस देणे शक्य होईल. लसीकरणामुळं कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होत आहे. राज्यातील ७ जिल्ह्यामंध्ये हा कोरोनाच्या नवा डेल्टाप्लस व्हेरियंटचा संसर्ग झाला असून हा व्हायरस अंतंत्य धोकादायक असल्याचं निदर्शनात आलंय. या व्हायरसचा संसर्ग २१ जणांना झाला आहे. महाराष्ट्राला पुरेसा लशींचा साठा उपलब्ध झाल्यास दोन महिन्यांतच राज्यातील सर्वाचे लसीकरणं करणं शक्य होईल. डेल्टाप्लसचा संसर्ग झालेल्या २१ जणांपैकी फक्त एका रुग्णाने लशीची पहिली मात्रा घेतली होती अशी माहितीही नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT