uddhav-thackeray-sad 
मुंबई

राज्य मंत्रिमंडळाची बैठक, OBC आरक्षणावर निर्णय?

ओमकार वाबळे

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षण निर्णय, ओमिक्रॉनचे संकट यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी राखीव असलेल्या २७ टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. विरोधक देखील आक्रमक झाले आहे. त्याचमुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयाबाबत आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते.

ओमिक्रॉन संदर्भात नव्याने नियमावली येण्याची शक्यता आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसं आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. राज्य सरकारने ओबीसी समाजाला दिलेलं 27 टक्के आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर 1 हजार 802 जागांवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. यातील 400 जागांवरील निवडणुकांवर थेट स्थगिती आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT