Minor girl assaulted 
मुंबई

Mumbai Crime: कोचिंग सेंटर चालवणाऱ्या 3 भावांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दोन वर्षांपासून सुरु होता प्रकार

Minor girl was sexually assaulted: दक्षिण मुंबईतील हा धक्कादायक प्रकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai crime: मुंबईमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तिघा भावांकडून पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

दक्षिण मुंबईतील हा धक्कादायक प्रकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा भावांना पोलिसांनी अटक केली आहे, तर मोठा भाऊ अद्याप फरार आहे. समुपदेशनादरम्यान मुलीने हा उलगडा केला आहे. बाल विकास केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन भावांचे वय २४, २५ आणि २७ असे आहे. २०२२ पासून कोचिंग सेंटरमध्ये मुलीवर अत्याचार केला जात होता. बदमानी होईल म्हणून मुलगी घरी आईला काही सांगत नव्हती. पीडित मुलीच्या आईचा घटस्फोट झाला होता. नियमित अत्याचारामुळे मुलगी धक्क्यात गेली होती. ती कोणाशी बोलत नव्हती. त्यामुळे तिच्या आईने मुलीला बाल विकास केंद्रामध्ये पाठवले होते.

मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने आपबीती सांगितली. मात्र, मुलीची आई आणि मुलगी तक्रार दाखल करण्यास घाबरत होते. त्यानंतर बालविकाल केंद्राकडूनच तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोठा भाऊ फरार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरमध्ये ३५ ते ४० मुली शिक्षण घेतात. त्यामुळे इतर मुलीवर देखील असा अत्याचार झालाय का? याचा तपास सुरु आहे.

गतिमंद भाचीवर अत्याचार करणाऱ्या मामाला जन्मठेप

अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मामाला 'पोक्सो' कायद्यानुसार दोषी ठरवून दिंडोशी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गणेश वंजारे असे आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांनी शिक्षा सुनावताना आरोपीला २५ हजारांचा दंडही ठोठावला आहे. आईच्या मृत्यूनंतर १२ वर्षीय पीडित गतिमंद मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्या मामाने घेतली होती.

मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघड झाल्यानंतर पवई पोलिसांनी मामाविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ४ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याला अटक केली. यावेळी मुलीची असहाय्यता आणि अगतिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या आरोपीला यापुढे उर्वरित आयुष्य तुरुंगातच भोगावे लागेल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT