भाईंदर : भाईंदर जवळील उत्तन गावा नजिकच्या चौक परिसरात नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग तब्बल सोळा वर्षांनी मोकळा झाला आहे. पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेली अंतीम परवानगी महापालिकेच्या हाती पडली आहे. पुढील आठवड्यात पुतळा उभारण्याचे काम सुरु केले जाणार आहे. (Mumbai news )
वसई किल्ल्यावर विजयश्री मिळवण्याआधी नरवीस चिमाजी अप्पा यांनी उत्तनजवळी चौक गावातून पोर्तूगिजांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी उंचावर असलेल्या धारावी किल्ल्यातून वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे आणि पोर्तूगिजांची समुद्र मार्गाने येणारी रसद तोडणे सहज शक्य होते. चिमाजी अप्पाचे पदस्पर्श चौक गावाला लाभले असल्याने याठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने 2004 मध्ये घेतला होता. त्यानुसार पुतळा बसविण्यासाठी चौक गावात चबुतरा बांधणे तसेच आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले.
वसई किल्ल्याच्या अगदी समोर हे स्मारक असणार आहे. 2005 पासून पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न महापालिकेकडून सुरु होते. परंतू परवानगी हाती पडत नसल्यामुळे स्मारक उभारणीचे काम पूर्ण झालेले नाही. नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारुढ पुतळा देखील गेली अनेक वर्षे तयार आहे. अखेर ठाणे जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली पुतळा समितीची गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकित पुतळ्याला मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतरही ही परवानगी महापालिकेच्या हाती पडली नव्हती. माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद यांनी ही बाब खासदार राजन विचारे यांच्या कानावर घातल्यानंतर विचारे यांनी ही परवानगी तातडीने मिळवून दिली अशी माहिती गोविंद यांनी दिली.
सध्या समारक परिसराची दुर्दशा झाली आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रान वाढले आहे. प्रवेशद्वाराची देखील मोडतोड झाली आहे तसेच काही जणांचा समारकाच्या जागेत अतिक्रमण करण्याचा देखील प्रयत्न आहे. या पार्श्वभुमीवर स्मारक परिसराची तातडीने स्वच्छता करुन याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात याव्यात तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगरसेविका हेलन गोविंद यांनी केली आहे.
परवानगी मिळाल्यामुळे पुतळा उभारणीचे काम पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. परिसराची स्वच्छता करुन आवश्यक ती डागडुजी करण्यात येईल -
दिपक खांबित, कार्यकारी अभियंता, मिरा भाईंदर महानगरपालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.