Dilip dhole in coffee with sakal event sakal media
मुंबई

मीरा-भाईंदरची तहाण पूर्ण होणार; २०२३ पर्यंत मिरा-भाईंदर जल स्वयंपूर्ण

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांचा विश्वास

सकाळ वृत्तेसेवा

नवी मुंबई : मिरा-भाईंदर पालिका (Mira-bhayandar municipal corporation) हद्दीतील पाणीटंचाईवर मात (water scarcity) करण्यासाठी सूर्या धरणातून २१८ एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. पालिका आयुक्त दिलीप ढोले (Dilip Dhole) यांनी ही माहिती दिली. सप्टेंबर २०२३ पर्यंत शहरांना मुबलक पाणी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कॉफी विथ सकाळ’ (coffee with sakal) या कार्यक्रमात टीम सकाळसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मिरा-भाईंदरच्या विकासाची व्याख्या विषद केली.

मिरा-भाईंदरला खूप वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टंचाईला कंटाळलेल्या जनतेने अनेकदा रस्त्यावर उतरून रास्ता रोको, रेले रोको आणि ठिय्या आंदोलन केलीली आहेत. आयुक्त पदाचा भार स्वीकारल्यानंतर दिलीप ढोले यांनी या मूलभूत समस्येचे मूळ शोधून काढले. शहराची तहान सर्वार्थाने कशी भागेल, याचा विचार करण्यासाठी त्यांनी प्रशासनाला कामाला लावले. त्यातून सूर्या धरणातून २१८ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा पर्याय पुढे आला. या कामी ‘एमएमआरडीए’ पालिकेला मदत करीत आहे.

सूर्या धरणातील पाणी शहरात आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम ४५ टक्क्यांपर्यंत झाले आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत शहराला २१८ एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाला, तर २०४६ पर्यंत म्हणजे पुढील ५० वर्षांपर्यंतची शहराची पाणीटंचाई दूर होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नगर पुनरुत्थान योजनेतून सरकारने आर्थिक मदत मिळावी, यासाठी तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहे. शहराची पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. सध्या स्टेम आणि एमआयडीसीद्वारे पुरवल्या जाणाऱ्या योजनेतून शहराला पाणीपुरवठा केला जात असल्याचे ढोले म्हणाले.

ऐतिहासिक ठेवा

विविध यंत्रणांकडून घेतलेल्या ना हरकत दाखले आणि परवानग्यांमुळे महापालिकेला चिमाजी आप्पा यांच्या स्मारकात पुतळा बसवता आला आहे. आता लवकर पालिका हद्दीत येणाऱ्या दोन्ही किल्ल्यांचे रूपडे पालटणार आहे. घोडबंदर आणि उत्तनच्या जंजिरा दारावे किल्ल्याचे संवर्धन केले जाणार आहे. लेटराईट आणि बेसाल्ट खडकांचा वापर करून संवर्धनाचे काम केले आहे. तब्बल १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अधिकच्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पात केली जाणार आहे. तसेच शहरातील खाडीकिनारी चौपाटी विकसित केल्या जाणार आहेत. समुद्राची स्वच्छता मोहीम राबवून सर्व परिसराचे सुशोभिकरण केले जाणार आहे. तसेच शहरात आयकॉनिक पद्धतीने भगवान गौतम बुद्धांचे विहार तयार केले जात आहे. आगामी काळात किल्ले, चौपाट्या आणि बुद्ध विहार हे शहराची ओळख होणार असून ते पाहण्यासाठी लवकरच हेरीटेज वॉक सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT