MLA Ashish Shelar sakal media
मुंबई

'हिंदूंच्या सणांना परवानगी देताना हाताला लकवा का भरतो'

सकाळ डिजिटल टीम

भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावरून निशाणा साधला आहे. राम भक्तांवर ठाकरे सरकारचा काय राग आहे कळत नाही. जेव्हा जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? अशा प्रश्न अशिष शेलारांनी उपस्थित केला.

गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची सष्टता नसल्याचं शेलारांनी म्हटलं. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे, असं कारण देण्यात आलंय. 10 मार्च ते 8 एप्रिल 144 कलम लावण्यात आलंय.

शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाही. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालतं. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे आम्ही चालू देणार नाही, असं अशिष शेलार यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी मुंबईतील नालेसफाईत झालेल्या भ्रष्टाचारावर टीका केली. मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचं ठरवलं आहे.

मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाईची पाहणी आणि सुरुवात करणार आहे, असं शेलार म्हणाले. सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसेल आहेत. आम्ही दोघांवरही नरज ठेऊन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर; 'या' दोन तारखा आहेत महत्त्वाच्या

Bank Deposit: भारतात बँक ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे युग संपले; SBIच्या माजी प्रमुख असं का म्हणाल्या?

Latest Marathi News Updates : वडीगोद्री रोडवर मराठा ओबीसी आंदोलक समोरा समोर आल्याने गोंधळ

Sharad Pawar: श्रीगोंद्याचे शिष्टमंडळ घेणार शरद पवारांची भेट, जाणून घ्या काय आहे कारण?

आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले अन्...! R Ashwin शतकी खेळीनंतर काय म्हणाला ते वाचा

SCROLL FOR NEXT