Ashadhi Wari 2023 Sakal
मुंबई

Ashadhi Wari 2023 : आमदार बालाजी किनीकर वारकऱ्यांच्या सेवेत! वारकऱ्यांच्या पायाला केली मालिश

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : वारकरी सेवा हीच ईश्वर सेवा मानली जात असल्याने अनेक अनुयायी आषाढी वारीला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत असतात. अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किनीकर यांनी शुक्रवारी जेजुरी मुक्कामी वारकऱ्यांच्या पायाला मालिश करून देत ईश्वरी सेवेचा लाभ घेतला.

अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आषाढी वारी आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागातून लाखोंच्या संख्येने वारकरी वारीसाठी पंढरपूरला येत असतात. वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा मानत हजारो अनुयायी आपल्या परीने या वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होत असतात.

आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शुक्रवारी जेजुरीत मुक्कामी आहे. या वारीत हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी चालत निघाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर हे कार्यकर्ते आणि रोटरी क्लबच्या सदस्यांसह तिथे दाखल झाले आहेत.

वारीत पायी चालून वारकऱ्यांच्या पायात गोळे येत असल्याने आणि पाय दुखत असल्यानं आमदार बालाजी किणीकर यांनी वारकऱ्यांच्या पायाची मालिश करून देत त्यांची सेवा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

Kolhapur : घरातून भूतपिशाच्च घालवतो सांगून कोल्हापुरात वृद्धाला 85 लाखांचा गंडा; भोंदू, बुवांवर विश्वास ठेवणे बनले धोकादायक

Irani Cup Winner : मुंबई संघाने २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक; Tanush Kotian च्या शतकाने शेष भारताच्या स्वप्नांचा केला चुराडा

Stock Market: पुढच्या आठवड्यात शेअर बाजार कोसळण्याची शक्यता; ही आहेत 5 मोठी कारणे

SCROLL FOR NEXT