डोंबिवली : व्हा तयार... करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार अशा आशयाचे बॅनर कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने झळकविण्यात आले आहेत. हे बॅनर एकच चर्चेचा विषय ठरले असून यावर आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा देखील फोटो आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत भाजपने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे. त्याचेच सूतोवाच हे बॅनर असल्याची चर्चा होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 255 जागा लढविण्याचे सांगितले आहे. तर भाजपचे वरिष्ठ नेते यांनी देखील भाजपने 288 जागा लढल्या पाहिजे असे विधान केले होते.
नुकतीच कल्याण पूर्वेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी 5 जागा भाजपाला मिळाल्या पाहिजे. तशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण पूर्वेत भाजप कल्याण जिल्हा कोर कमिटी व जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि इतर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीच्या आधी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयात कल्याण जिल्हा कोरकमिटीची छोटी बैठक पार पडली आहे.
तसेच या बैठकी निमित्ताने शहरात भाजपचे आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या वतीने कोर कमीटीचे स्वागत करणारे बॅनर लागले आहेत. या बॅनरवर व्हा तयार करू पुन्हा एकदा विजयाचा एल्गार असा संदेश देण्यात आला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्यावतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे येत्या विधानसभेत कल्याण पूर्वेतून सुलभा गणपत गायकवाड या निवडणूक लढवणार असल्याची चर्चा लागलेल्या बॅनरमुळे होऊ लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.