मुंबई

मोठी बातमी - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड क्वारंटाईनमध्ये...

सकाळवृत्तसेवा

ठाणे - ठाण्यातील कळवा मुंब्रा भाग 'कोरोना रेड झोन'मध्ये आहे. ठाण्याच्या या भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळल्याने या भागाला ठाणे महापालिकेकडून सील देखील करण्यात आलं आहे. अशात याच भागातील राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता स्वतःला क्वारंटाईन केलंय. कोरोना पॉझिटिव्ह पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्याने आमदार आणि  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय.

ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा या भागात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. याच भागात ड्युटीवर असणाऱ्या एक पोलिस कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलाय. मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा या पोलिस कर्मचार्यांशी संपर्क आल्याने त्यांनी खबरदारी म्हणून स्वतःला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय. या भागातील काही पत्रकारांचा देखील या पोलिस कर्मचार्यांशी संपर्क आल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे त्यांना देखील आता क्वारंटाईनमध्ये जाण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आल्याची माहिती आहे.  याबाबत माहिती एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोरोनाशी लढताना डॉक्टर्स आणि पोलिसांकडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता २४ तास काम सुरु आहे. अशात आता अनेक डॉक्टर्स आणि पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याच्या अनेक केसेस समोर येतायत.  

MLA jetendra awhad puts himself in self quarantine after meeting corona positive cop

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT