मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे दुसऱ्या टप्यातील कोविड केअर केंद्राचे काम पूर्ण झाले असून आज त्याचे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आले. एक हजार खाटांची व्यवस्था असलेल्या या केंद्रात गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचाराची सुविधादेखील आहे.
पहिल्या टप्यातील रुग्णालयात महानगरपालिकेकडून रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. सद्यस्थितीत 500 हुन अधिक रुग्ण हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत . मागील काही दिवसापासून दर दिवशी सुमारे 30 रुग्ण निरोगी होऊन घरी परतत आहेत .
मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूमुळे बाधित होत असलेल्या रुग्णांची संख्या पाहता एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोविड सुविधा केंद्राचे काम सुरू करण्यात आले. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक हजार खाटांचे केंद्र केवळ 15 दिवसांत बांधून पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 30 मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील रुग्णालय उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली.
रुग्णांसाठी 'या' असतील सुविधा:
दुसऱ्या टप्प्यातील कोविड सुविधा केंद्रात एक हजार खाटांची सुविधा आहे. त्यापैकी 100 खाटांचा अतिदक्षता विभागदेखील आहे. व्हेंटिलेटर मशीन (30 नग ), डायलेसिस मशीन (18 नग), आयसीसीयु खाटा , सिटीस्कॅन मशीन , आरओ स्टिस्टम, क्वारंटाईन बेड्स, ऑक्सिजन पाईप लाईनचे कनेक्शन , नॉईसलेस सक्शन, पोर्टेबल एक्स रे मशीन , ई सी जी मशीन , पल्स ऑक्सिमीटर , डिजिटल बी पी अँप्रेटस, पोर्टेबल, शवागार (12 क्षमता ) अशा प्रकारचेवैद्यकीय उपकरणे व हाऊस किपींग , रुग्णालयातील देखरेखसाठी सीसीटीव्ही कॅमरे तसेच डायलिसिसची सुविधादेखील असून 900 खाटांपैकी काही खाटांना ऑक्सिजन सुविधा देण्यात आली आहे.
हेही वाचा: बापरे! तब्बल 600 अभियंत्यांना 'या' कामांसाठी जुंपले; महापालिकेचे विकासकामांकडे दुर्लक्ष..
ही सुविधा तात्पुरती स्वरूपाची असली तरी पावसाळ्यात टिकून राहण्याची क्षमता यामध्ये असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात पाणी साचून केंद्रात येऊ नये यासाठी जमिनीपासून नऊ इंचावर प्लायवूडचे फ्लोअरिंग केले आहे. ताशी 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याला तोंड देण्याची क्षमता असलेल्या पीव्हीसी आच्छादनाचा वापर करण्यात आला आहे असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे.
MMRDA made second covid care hospital in mumbai
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.