raj thackeray sabha in goregaon raj thackeray slam cm eknath shinde maharashtra political news  esakal
मुंबई

Raj Thackeray News: युती-आघाडी हा माझा निर्णय, तुम्ही चर्चा सुद्धा करायची नाही, राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News - मुंबईच्या एमआयजी क्लब वांद्रे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक पार पाडली. बैठक पार पडल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने ही बैठक पार पडल्याचं सांगितलं. पण, बैठकीमध्ये भाजपसोबत युती करायची का नाही, याबाबत चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे.

भाजपकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीची ऑफर मिळाली आहे. या ऑफरवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. पण, युतीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आलंय. (mns chief raj thackeray will join bjp alliance soon mumbai meeting)

मनसेच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीची ठरवण्यात आली. त्याबरोबरच बैठकीत युतीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. 'युती आघाडी हा माझा निर्णय असेल तुम्ही यात पडायचं नाही', असं राज ठाकरेंनी सरचिटणीस यांना बैठकीत स्पष्ट केलंय.

'याबाबतीत तुम्ही चर्चा सुद्धा करायची नाही. पक्ष वाढवणे हे आत्ताच्या घडीला महत्वाचे आहे', असं राज ठाकरे बैठकीत म्हणाल्याचं कळतंय.

येत्या काळात युती करणार का? असा प्रश्व राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर राज म्हणाले की, 'परिस्थिती पाहून कोणासोबत जायचं आणि कोणा सोबत नाही हे ठरवलं जाईल. मागील काही वर्षात महाराष्ट्राने खूप काही पाहिलं आहे.

कोण कोणासोबत जाईल याची खात्री देता येत नाही. महाराष्ट्राच्या जनतेलाही याची आता सवय झाली आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेऊ.' राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

पत्रकारांना बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यादृष्टीने ही बैठक होती. मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. आमची टीम मतदारसंघात जाईल आणि त्याठिकाणी काय काम करायचं ते पाहतील.

महानगरपालिकेच्या निवडणुका या वर्षी लागतील असं वातावरण मला काही दिसत नाही. महाराष्ट्रात जो राजकीय गोंधळ झाला आहे. त्यावरुन महानगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता नाही, असं ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT