मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांना मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी ताप येत होता म्हणून खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अमित ठाकरेंची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती. मात्र कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता, खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं.
लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मलेरिया आणि इतर चाचण्या करण्यात आल्या होत्या.त्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हा ताप व्हायरल असण्याची शक्यता आहे. येत्या एक ते दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात येईल, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली होती.
मेट्रोचं कारशेड बनवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे जंगलातील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अमित ठाकरे यांनी आरेतील झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यानंतर मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयानंतर मित ठाकरे यांनी आरे लढा यशस्वी झाल्याचं सांगत राज्य सरकारचे तसंच आपल्या काकांचे म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
MNS Leader Amit Thackeray discharged from Lilavati Hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.