मुंबईः मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं. मनसेनं वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांमध्ये हे सविनय कायदेभंग आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या मनसेच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसे नेते संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत यांचा समावेश आहे. कर्जत लोहमार्ग पोलिसांनी आता वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे.
तसंच आज 22 सप्टेंबरला कल्याण रेल्वे कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे. मुंबई लोकल सुरु करा या मागणीसाठी मनसे सोमवारी रस्त्यावर उतरली होती. यावेळी मनसेकडून सविनय कायदेभंग करत विनापरवाना लोकलमधून प्रवास करण्यात आला. यावेळी रेल्वे पोलिसांना गुंगारा देत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला होता. तसेच संतोष धुरी, गजानन काळे, अतुल भगत या मनसे नेत्यांनीही रेल्वे प्रवास केला होता.
संदीप देशपांडे यांच्यासह आंदोलन करणाऱ्या 3 पदाधिकाऱ्यांवर आपत्तीकाळात सरकारची कोणतीही परवानगी नसताना प्रवास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, 52 तसंच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, त्यासह भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MNS Leader Local Protest crimes case filed against Sandeep deshpande and other three leader
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.