MNS MLA raju patil sakal media
मुंबई

पलावा जंक्शन परिसरातील वायू प्रदूषण रोखा; आमदार पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण शीळ रोडचे सिमेंट काँक्रीटीकरणचे (cement concrete work) काम सुरू आहे. वाहनांमुळे माती व सिमेंटचा धुरळा उडून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पलावा जंक्शन परिसरात (Palava junction area) चारही दिशेने वाहने येत असल्याने या ठिकाणी तात्पुरता स्वरूपात डांबरीकरण करण्यात यावे अशी सूचना कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी अधिकाऱ्यांना दिली. कल्याण शीळ रोडचे एमएसआरडीसीच्या (MSRDC) माध्यमातून सिमेंट काँक्रीटीकरणचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याची सोमवारी आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यां समवेत पहाणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अभियंता नागपाल, उप अभियंता बोरडे, केडीएमसीचे इ वॉर्ड अधिकारी राजेश वसईकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल चौधरी उपस्थित होते.

कल्याण शिळ रस्त्याच्या डीपीआर मध्ये नैसर्गिक नाल्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या मध्ये हे नैसर्गिक नाले नसल्याने रस्त्यावर पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात होती. या संदर्भात मनसेचे आमदार पाटील यांनी शासन स्तरावर नैसर्गिक नाले उभारणीसाठी पाठपुरावा केला होता. यावर एमएसआरडीसी ने नवीन नाले निधी उपलब्धतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. हे नाले काम झाल्यास पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून वाहनचालकांना होणारा त्रास कमी होणार आहे.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी ?

कल्याण शिळ रोड वरील पलावा चौक महत्वाचा आहे. या चौकात निळजे हेवन, काटई, कासा रिओ पलावा सिटी आणि शिळफाटा येथून वाहनांची वाहतूक होत असते. मात्र चौकातील अनधिकृत बांधकामे हि वाहतूक कोंडी सह अपघातांना निमंत्रण देखील देत आहेत. पलावा जंक्शन परिसरात पलावा पुलाचे काम सुरु आहे. यात आडकाठी ठरणारी धोकादायक अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महानगरपालिका चालढकल करत आहे. या बांधकामांवर महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी अशी मागणी देखील वाहनचालक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT