sanjay raut  
मुंबई

राऊतांची गाडी पल्टी... मनसेकडून सामना कार्यालयासमोर बॅनरबाजी

ओमकार वाबळे

शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील पोस्टरवॉरला रंग चढला आहे. याआधी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेत मनसेने सेना भवनाबाहेर बॅनर झळकवले होते. त्यानंतर आज सामना कार्यालयाबाहेर मनसेने खासदार संजय राऊत यांच्यावरच निशाणा साधला आहे. (MNS teases Sanjay Raut)

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवैसी आहेत, असं विधान केलं होतं. ठाकरे म्हणजे भाजपचा भोंगा असल्याचं ते म्हणाले. यानंतर मनसेने पोस्टरबाजी करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. (Mosque Loud Speaker Controversy)

ओवैसी कोणाला बोलता संजय राऊत? तुमचा कर्कश भोंगा बंद करा. तुम्ही मशीदीमधील मौलाना आहात का? असा प्रतिप्रश्न मनसेने उपस्थित केलाय. यासोबतच मनसेकडून राऊतांच्या पल्टी झालेल्या गाडीचा फोटो टाकण्यात आला आहे. (Raj Thackeray)

संजय राऊत मनसेच्या स्थापनेआधी राज ठाकरे यांची समजूत घालण्यासाठी 'कृष्णकुंज'वर आले होते. यावेळी आक्रमक मनसैनिकांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणा दिल्या. आणि काही वेळाने त्यांची गाडी पल्टी करण्यात आली होती. हा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. या घटनेची पुनरावृत्ती व्हावी का? असा इशारा ही मनसैनिकांनी देत शिवसेनेला डिवचलंय. माहिम विधानसभा मतदार संघातील लक्ष्मण पाटील, उमेश गावडे, नितीन लाड या मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT