मुंबई

'चला !!! मनसे विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं', अभिजीत पानसेंचा मार्मिक टोला

उद्धव ठाकरेंनी हातावर बांधलं शिवबंधन

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत सर्वच पक्षांनी आता महापालिका निवडणुकीच्या (bmc election) दृष्टीने तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर काल शिवसेनेने (shivsena) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार धक्का दिला. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व सरचिटणीस आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar joins Shivsena) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. (Mns student wing chief aditya shirodkar join shivsena abhijeet panse reaction on it dmp82)

आदित्य यांचा शिवसेना प्रवेश राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा एक झटका मानला जात आहे. कारण आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर आणि राज ठाकरे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंध आहेत. मनसेमध्ये विविध जबाबदाऱ्या भूषवताना आदित्य यांनी २०१४ मध्ये मनसेकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मनसे विद्यार्थी सेनेच्या कामावरून मनसेत त्यांच्याबद्दल नाराजी होती.

परिणामी आदित्य हे देखील फारसे सक्रिय नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि शिरोडकर यांच्यात गेल्या वर्षी वाद झाला होता. शिवसेनेत उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी शिरोडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. आदित्य यांच्या शिवसेना प्रवेशावर ठाण्यातील मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी अत्यंत मार्मिक टीका केली आहे. 'चला !!! महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं' असं, त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT