मुंबई - मुंबईत पूराच्या पाण्यात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून लवकरच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. लोकल ट्रेन पावसाच्या पाण्यामुळे विस्कळीत झाल्यास प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यासाठीची बैठक आज पार पडली. या बैठकीत प्रत्येक विभागातील नोडल अधिकाऱ्याला मदतकार्य पोहचवण्याच्या अनुषंगाने सूचनाही देण्यात आल्या.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील २४ विभागांमध्ये एक नोडल अधिकारी हा पूरात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मदतीसाठी नेमला आहे. अभियंता दर्जाचा अधिकारी या कामासाठी नेमण्यात आला आहे. प्रवाशांना महापालिकेच्या निवाऱ्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय सुविधा आणि खाण्यापिण्याच्या सुविधा देण्यात येतील. आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देतानाच अशा प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या उदिष्टाने मॉक ड्रिल करण्याचे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिले होते.
पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच प्रवाशांना योग्य मदत मिळावी यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षाला दिलेल्या भेटीतही दिले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशा प्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहचता यावे यासाठी एसटी आणि बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश तसेच सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) बाबत कार्यवाही करण्याचेही आदेश आयुक्त चहल यांनी दिले होते. पूरस्थितीसारख्या संभाव्य परिस्थितीत नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टने तयारी केली आहे. तसेच ११ जादा बसेसची सुविधा एसटी महामंडळाकडूनही करून देण्यात आली आहे.
मॉक ड्रील
मुंबई महापालिका क्षेत्रात पूराच्या पाण्यात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करणे हे प्रमुख काम विभागवार अशा नोडल अधिकाऱ्यांचे असेल. ्याचप्रमाणे अशा प्रवाशांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि नाष्ट्याची व्यवस्था करून देण्यासाठी मॉक ड्रील करण्यात येणार आहे. हे मॉकड्रील आठवड्य़ाभरात मुंबईतील विविध विभागात होणार असल्याचा अंदाज आहे. विभागीय पातळीवर हे मॉकड्रिल घेण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
कुर्ला, चेंबूर या दोन स्थानकांसाठी एल विभागात नियोजन झाले आहे. रेल्वे, एसटी, बेस्ट आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अनुषंगाने बैठका पार पडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही आपत्कानीन परिस्थितीसाठी सज्ज आहोत.
- महेश शिंदे, सहाय्यक आयुक्त, एल विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.