9 Years Of Modi Government pm nrendra modi big schemes and 9 big decisions check details  
मुंबई

Modi In Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवी मुंबई दौरा ठरला; असं असणार वेळापत्रक!

सकाळ डिजिटल टीम

Modi In Navi Mumbai : गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबई आणि उरणकरांना लागून राहिलेली प्रतीक्षा येत्या ३० ऑक्टोबरला संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो आणि बेलापूर-उरण मार्गावरील रेल्वे सेवेचे लोकार्पण होणार आहे. यासोबत ‘नमो महिला सशक्तीकरण’ या अभियानाचाही शुभारंभ होणार आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या तारीखनिश्‍चितीच्या गोंधळाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

‘नमो महिला सशक्तीकरणा’च्या देशव्यापी अभियानाकरिता नरेंद्र मोदी नवी मुंबईत येणार असल्याने गेल्या एक महिन्यापासून सरकारी यंत्रणांची लगबग सुरू होती. मोदींच्या या कार्यक्रमाला सुमारे एक लाख वीस हजार महिला आणण्याचे मोठे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम- उमेद) या विभागावर सोपवण्यात आले होते; परंतु या कार्यक्रमाकरिता तारीख निश्चित होत नसल्याने सरकारी यंत्रणांचा मोठा गोंधळ उडाला होता. हा कार्यक्रम म्हणजे भव्य सोहळा असल्यामुळे त्याची जागाही तेवढीच भव्य हवी असल्याने सरकारी यंत्रणांचा जागेचा शोधही सुरू होता.

आता मोदींचे येणे निश्चित झाल्यामुळे नवी मुंबईकरांना सिडकोने तयार केलेल्या बेलापूर ते तळोजा मार्गावरील मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. अनेक वर्षांपासूनचे उरणकरांचे लोकल सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बामणडोंगरीपासून उरणदरम्यान सर्व रेल्वे स्थानके पूर्ण झाली असल्याने मोदींच्या हस्ते बेलापूर ते उरण रेल्वे मार्गाचे लोकार्पण होणार आहे. नमो महिला सशक्तीकरण अभियानातून लाखो महिला बचत गटांना नव्या सवलती मिळणार आहेत.

विमानतळाच्या जागेवर सोहळा

नवी मुंबईतील उलव्याजवळील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकाम क्षेत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सोहळा होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला सरकारतर्फे जवळपास एक लाख वीस हजार महिला आणि नवी मुंबई व पनवेलमधील स्थानिक लोकप्रतिनिधींवर दिलेल्या जबाबदारीनुसार चार लाख असे एकूण सहा लाखांच्या घरात नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सोहळ्याकरिता सुमारे ५० हेक्टर जागा घेण्यात आल्याचे समजते. एक लाखांहून अधिक वाहने येणार असल्याने त्यांच्या वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी २० हेक्टर जागा आरक्षित केली जाणार असल्याचे समजते.

ऑक्टोबर हिटचे सावट

एप्रिल महिन्यात खारघर येथे सेंट्रल पार्क मैदानावर ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्यावेळी अनेकांना उकाड्याचा त्रास झाला होता. उष्माघाताने काही नागरिकांचा बळी गेला होता. सध्या ऑक्टोबर महिना सुरू असून कडाक्याच्या उन्हाचे सावट या कार्यक्रमावर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT