Arvind Savant Sakal
मुंबई

Modi Visit to Mumbai: "माजू नका! अन्यथा आम्हाला माज उतरवता येतो"; कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं अरविंद सावंत संतापले

मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना शिवसेनेचे खासदार सावंत यांनी इशारा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत आज विविध विकासकामांचं लोकार्पण होत आहे. यामध्ये मेट्रोच्या नव्या लाईन्सचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत चांगलेच भडकले आहेत. माजू नका! अन्यथा आम्हाला माज उतरवता येतो, अशा शब्दांत त्यांनी या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. (Modi Visit to Mumbai Arvind Sawant was angry because his name was not in invitation card)

अरविंद सावंत म्हणाले, हा कार्यक्रम मुंबई महापालिका आणि राज्य शासनाचा आहे, भाजपचा नाही. दुर्दैवानं देशाचे पंतप्रधान देशाचे प्रमुख असल्याचं वागताना दिसत नाहीत. त्यामुळं हा कार्यक्रम भाजपचा आहे असं त्यांना वाटतं. आत्ता तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. यामध्ये मुंबईतील सहा खासदारांपैकी एका खासदाराचं नाव छापलेलं नाही, तो मी आहे. यामध्ये दोन मिंधे आहेत, तीन भाजपचे ओरिजनल खासदार आहेत.

त्यामुळं हा कार्यक्रम कोणाचा आहे, हे जनतेच्या नजरेसमोर येतंय. फक्त मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. फेरीवाल्यांना दहा हजार रुपये, टीशर्ट, बँक खातं अशी खैरातही करण्यात आली आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील विवध प्रकल्पांसाठी काम केलं. तसेच पर्यावरणासाठी ज्यांनी व्यक्तीशः काम केलं आणि मंत्री म्हणून ज्यांनी आदर्श उभा करण्याचं काम केलं ते आदित्य ठाकरे यांनी अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. याच प्रकल्पांचं उद्घाटन आज भाजपकडून आम्हीच केलं असं सांगून उद्घाटन केलं जातंय, अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT