राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने कारवाई करत घरावर छापे टाकले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मलिक यांना १९९३ बाॅम्ब ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित आरोपीच्या प्रकरणात मलिकांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, भाजपच्या मोहित कंबोज याने ट्वीट करत मलिकांवर टीका केली आहे.
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती.
त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वानखेडे प्रकरणात आरोप करताना मलिकांनी मोहित कंबोज आणि त्याचा भाजपशी असलेला संबंध अधोरेखित केला होता. यानंतर कंबोज प्रकरण मीडियातही गाजलं. आता कंबोजने मलिकांच्या ईडी कारवाईवरही सूचक वक्तव्य केलंय. (Mohit Kamboj Bharatiya Tweet)
मोहित कंबोजचं ट्वीट
भारतीय जनता पक्षाच्या मोहित कँबोज यांचं ट्विट
"जय श्री राम"
"सुबह 5 बजे उठा के ले के जाते हैं , इंसान खुद नहीं जाता !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.