Aamle Village sakal
मुंबई

Mokhada News : मोखाड्यातील 17 गावपाडे दरडीच्या सावटाखाली; नागरिकांना सुरळीत स्थळी ठेवण्याच्या हालचाली सुरू

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात गेली आठवडाभरापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भगवान खैरनार

मोखाडा - पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात गेली आठवडाभरापासुन मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण आणि दरी डोंगरात वसलेल्या मोखाडा तालुक्यात  17  गावपाडे डोंगराच्या पायथ्याशी व माथ्यावर वसलेली आहेत. येथे दरडी कोसळण्याची भिती आहे.

मुसळधार पावसाने मोखाड्यात माळीण आणि ईर्शालवाडीच्या घटनेची पुर्नरावृती होऊ नये तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी या 17 गावपाड्यांतील डोंगरपायथ्याशी, माथ्यावर आणि कपारीत वास्तव्यास असलेल्या नागरीकांचे सर्व्हेक्षण करून त्यांना तेथे न जाण्याच्या, दवंडीद्वारे तसेच समाज माध्यमातून सुचित करण्याचे आदेश, मोखाडा तहसीलदारांनी प्रशासनाला दिले आहेत. 

पालघर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यातील धरणे ओहरफ्लो झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी माळीण आणि ईर्शालवाडीच्या दुर्घटनेनंतर सरकार अलर्ट झाले आहे.

Behetwati Village

मोखाडा तालुक्यातील दरडीच्या सावटाखाली असलेल्या गावपाड्यातील नागरीक, डोंगराच्या पायथ्याशी, डोंगर माथ्यावर आणि डोंगर कपारीत वसले आहेत. तसेच शेतीच्या कामासाठी याठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. त्याची माहिती व सर्व्हेक्षण करणे, प्रशासनाने सुरू केले आहे. 

मोखाडा तालुक्यात 13 महसुली गावांमधील  सावर्डे, धामणशेत, बेहेटवाटी, पळसपाडा, गायमुखपाडा, रायपाडा, पांडवलेणीचा भाग, आमले, आंब्याची विहीर, नाशेरा, बोरशेती, बिवलपाडा, करोळी, कुडवा, ईकरीचापाडा, चिकनपाडा, पांगरी, पासोडीपाडा आणि  वांगणपाडा या डोंगराच्या पायथ्याशी, डोंगर माथ्यावर आणि कपारीत वसलेली असुन मुसळधार पावसामुळे येथे दरड कोसळण्याची तसेच भुस्खलन होण्याची भीती आहे.

या भागातील जे नागरीक डोंगर पायथ्याला, माथ्यावर तसेच कपारीत वास्तव्यास आहे, त्यांची पाहणी करून त्यांना संभाव्य धोका टाळण्यासाठी येथे न जाण्याच्या, खबरदारी घेण्यासाठी दवंडीद्वारे आणि समाज माध्यमाद्वारे सुचित करण्यात यावे. तसेच येथील नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची गरज असल्यास त्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला देण्याचे आदेश मोखाडा तहसीलदार मयुर खेंगले यांनी गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत. 

गतसाली घडलेल्या ईर्शालवाडीच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क आहे. मोखाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खबरदारी चा ऊपाय म्हणून डोंगर पायथ्याला, डोंगर माथ्यावर आंणि डोंगर कपारीत वास्तव्यास असलेल्या नागरीकांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे.

- मयुर खेंगले, तहसीलदार मोखाडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT