मोखाडा - मोखाडा आणि त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोखाडा हद्दीतील तोरंगण घाटातील उतारावरील एक तीव्र वळण हे अपघाती वळण बनले आहे. याठिकाणी एक दिवसाआड अपघात होत आहे. याच ठिकाणी सोमवारी सकाळी एक विचित्र अपघात झाला आहे.
रविवारी 11 फेब्रुवारी ला रात्री एक आयशर ट्रक दरीत कोसळल्या नंतर तो ट्रक काढण्यासाठी ट्रक मालक हे आपल्या स्वीफ्ट कारमधून याठिकाणी आले होते. यावेळी त्यानी या वळनाच्या जागेवर आपली कार लावली होती.
त्यावेळी अचानक वरून थेट दूसरा आयशर ट्रक येवुन कारसह थेट दरीत कोसळला. अगोदरच त्या दरीत कोसळलेल्या ट्रक वर ही दोन्ही वाहने जावून आदळली. या विचित्र अपघातात आयशर ट्रक चा चालक मुसा खान (32) याचा मृत्यू झाला आहे.
मृत खान याचा मृतदेह ट्रक खाली फसल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने तो बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. तोंरगण घाटातील हे ठिकाण अतिशय धोकादायक असून नाशिक वरून येताना त्र्यंबकेश्वरच्या नंतर मोठा घाट सुरु होतो.
यावेळी मोखाडा हद्द सुरू होताच एक तीव्र उतार आहे. त्याठिकाणी येईपर्यंत वाहनाचे लायनर गरम झालेले असतात. तिथून खाली आल्यानंतर थेट उतार आणि जाग्यावर वळण असल्याने याठिकाणी एक दिवसा आड अपघात होत आहेत. अशातच हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात आयशर टेम्पो चालक मुसा खान चा मृत्यू झाला आहे.
एवढा मोठे अपघाती वळण असतानाही याठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक नाही. वाहनांचे ब्रेक फेल झाले तर वाहन अडवण्यासाठी काहीच उपाययोजना नाही. या भागात वाहनांना विश्रांती साठी जागा नाही. यामुळे याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मोठी उपाय योजना करून लोकांचें जीव वाचवणे गरजेचे आहे. मात्र, वर्षानुवर्षे शेकडो अपघात आणि शेकडो जीव जावूनही, याबाबत उपाय योजना होत नसेल तर मग उपाययोजना न करणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.