Crime 
मुंबई

Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

Attempting to kill a 35 year old woman inside the toilet: एका शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये एका ३५ वर्षीय महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- राज्याची राजधानी मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शॉपिंग मॉलच्या टॉयलेटमध्ये एका ३५ वर्षीय महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. (molesting and attempting to kill a 35 year old woman inside the toilet of a shopping centre in Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, महिला वकील आहे. दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्गावरील अशोका शॉपिंग सेंटरजवळ तिचे ऑफिस आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास महिला शॉपिंग सेंटरमधील कॉमन टॉयलेटमध्ये गेली होती. टॉयलेटमध्ये एक २१ वर्षीय व्यक्ती उपस्थित होता. महिलेने त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितले. आरोपीने बाहेर गेल्यासारखं केलं, पण जेव्हा महिला टॉयलेटला गेली तेव्हा तो पुन्हा आतमध्ये आला.

जेव्हा महिला टॉयलेटमधून बाहेर आली तेव्हा आरोपी तिला बाहेर उभा असल्याचा दिसला. आरोपीने दरवाजा आतून लावून घेतला होता. आरोपीने महिलेचा विनयभंग केला, त्यानंतर तिचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न केला. महिलेने आरडा-ओरडा सुरु केल्यानंतर त्याने महिलेच्या पोटात लाथ मारली आणि तो पसार झाला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आझाद मैदान पोलिसांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली. आरोपीचे नाव रामशंकर गौतम उर्फ संदीप पांडे असल्याचं कळतंय. तो जवळच्याच एका ऑफिसमध्ये सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो. आरोपी विरोधात हत्येचा प्रयत्न, विनयभंग, घातपाताचा कट अशा काही कलमाअंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Crime News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT