Naresh Goyal Sakal
मुंबई

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

मनी लॉन्ड्रींगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जेट एअर वेजचे माजी संचालक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज तूर्तास दिलासा दिला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मनी लॉन्ड्रींगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जेट एअर वेजचे माजी संचालक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज तूर्तास दिलासा दिला. वैद्यकीय कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयाने गोयल यांना २ महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. एक लाखाच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर न्यायालयाने त्यांची सुटका केली.

जेट एअर वेजचे माजी संचालक नरेश गोयल यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. आपल्याला व आपल्या पत्नीला कर्करोग झाला असून पत्नीची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी तिच्या सोबत राहण्यासाठी जामीन द्यावा अशी मागणी नरेश गोयल यांनी याचिकेद्वारे केली. या याचिकेला ईडीने मात्र जोरदार विरोध केला.

ईडीच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, सध्या अर्जदार गोयल हे त्याच्या स्वत: च्या पसंतीच्या डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत ते तिथे सुरक्षित असले तरी त्यांची प्रकृती ठीक नाही. न्यायालयाने त्यांना सोडण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला होता न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकल पीठाने आज (ता.६) गोयल यांचा अंतरिम जामीन अर्ज अटी व शर्तीसह मंजूर केला.

गोयल यांचा युक्तिवाद काय

गोयल यांच्यावतीने लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माजी सॉलिसिटर जनरल हरिष साळवे यांनी युक्तीवाद करताना  ईडीच्या कार्यपध्दतीवरच जोरदार आक्षेप घेतला. गोयल आणि त्यांच्या पत्नी कर्करोगाने ग्रस्त आहेत. पत्नीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये त्यांना जामीन देणे गरजेचे आहे.

ते केवळ मानवतावादी आधारावर जामीन मागत आहेत, ते कर्करोगाने ग्रस्त असल्याने केमोथेरपीदरम्यान आणि नंतरही त्यांना स्वच्छ निर्जंतुक वातावरणाची गरज भासणार असून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवणे शक्य नाही त्यामुळे न्यायालयाने त्यांना जामीन द्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT