मुंबई : घोरपड नावाच्या प्राण्यांबद्दल आपण सतत इतिहासात एकलं आहे आणि वाचलं आहे. घोरपड एकदा कोणत्या ठिकाणी चिकटली की तिची पकड सहजपणे सैल होत नाही. मात्र घोरपडीबद्दल काही जण अचंबित करणारा दावा करतात. हा दावा आहे घोरपडीच्या शरीराचं तेल बनवून वापरल्यामुळे सेक्स पॉवर वाढते असा. या दाव्यामुळे देशभरात अनेक घोरपडींची कत्तल केली जातेय. मात्र या दाव्यामागे खरंच काही तथ्य आहे का हे जाणून घेण्याची गरज गरज आहे.
खरंच घोरपड हा प्राणी जगात आणि भारतात कीती प्रमाणात शिल्लक आहे? घोरपडीच्या तेलानं खरंच सेक्स पावर वाढते का? तुम्हाला जे तेल घोरपडीचं तेल म्हणून दिल्या जातंय ते खरंच घोरपडीचं आहे का? असे काही प्रश्न निर्माण होतात.
याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. घोरपडीसारखा दिसणारा 'सांडा पाल' म्हणजेच 'Monitor Lizard' हा एक प्राणी आहे. या प्राण्याच्या अंगात एक विशेष प्रकारचं तेल असतं. या तेलात 'एफ्रोडिसिया' हा एक घटक असतो जो तेलासारखा दिसतो. देशभरात घोरपड समजून या प्राण्याची सर्रास कत्तल केली जाते. या पालींना त्यांच्या बिळातून बाहेर काढण्यात येतं आणि त्यांची कत्तल केली जाते. त्यानंतर त्यांच्या अंगातून तेल काढण्यात येतं. या तेलाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.
मात्र खरंच या दाव्यांमद्धे तथ्य आहे का? तर याचं स्पष्ट उत्तर 'नाही' असं आहे. सांडा पालीचं तेल वापरल्यामुळे हाडांच्या समस्या दूर होतात आणि सेक्स पावर वाढते असे दावे करण्यात येतात. मात्र यात काहीही तथ्य नाहीये. सांडा पालीची चरबी ही इतर प्राण्यांसारखीच असते. सांडा पालीचं तेल लावल्यामुळे काहीही फायदा होत नाही. याउलट त्याचे दुष्परिणाम होतात. हे तेल शरीराच्या ज्या भागावर लावलं त्या भागातली त्वचा जळू शकते. त्यामुळे लोकांनी आपल्यातील सेक्सची कमतरता दूर करण्यासाठी असं तेल लावण्यापेक्षा योग्य ते उपचार करायला हवेत असं काही तज्ज्ञांनी म्हंटलं आहे.
या खोट्या दाव्यांमुळे या निष्पाप प्राण्यांचा बळी जातोय. तर या तेलाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या गुजरात आणि कच्छच्या काही भागांमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे तुम्हीही या बाबतीत जागरूक राहणं आवश्यक आहे.
monitor lizard oil helps to increase power in human body reality behind this
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.